आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलदीपचा पंच, लाेकेशचे शतक; भारताची इंग्लंडवर ८ गड्यांनी मात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅचेस्टर- कुलदीप यादवच्या (५/२४) धारदार गाेलंदाजीपाठाेपाठ लाेकेश राहुलच्या (१०१) नाबाद शतकाच्या बळावर टीम इंडियाने सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडचा पराभव केला. भारताने ८ गड्यांनी पहिला टी-२० सामना जिंकला. यासह भारताने तीन टी-२० मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसरा टी-२० सामना शुक्रवारी रंगणार अाहे. 


नाणेकेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार विराट काेहलीचा हा निर्णय युवा गाेलंदाज कुलदीप यादवने याेग्य ठरला. त्याने धारदार गाेलंदाजी करताना पाच विकेट घेतल्या. यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान इंग्लंडला ८ गड्यांच्या माेबदल्यात १५९ धावा काढता अाल्या. प्रत्युत्तरात भारताने २ गड्यांच्या माेबदल्यात १८.२ षटकांत विजयाचे लक्ष्य गाठले. भारताकडून लाेकेश राहुलने १०१ अाणि काेहलीने नाबाद २० धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जाेस बटलरने एकाकी झंुज देताना अर्धशतक ठाेकले. त्याने ४६ चेंडूंत ६९ धावांची खेळी केली. 

 

कुलदीपच्या पाच विकेट

भारताच्या युवा गाेलंदाज कुलदीप यादवने सलामी सामन्यातच भेदक मारा करून यजमानांचे कंबरडे माेडले. त्याने ४ षटकांत २४ धावा देताना ५ गडी बाद केले. तसेच उमेश यादवने २ अाणि हार्दिकने १ विकेट घेतली. 

बातम्या आणखी आहेत...