आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची पर्सनल लाईफ, पाहा फोटो....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरमनप्रीत कौर विराट कोहलीसह - Divya Marathi
हरमनप्रीत कौर विराट कोहलीसह

स्पोर्ट्स डेस्क- भारतीय महिला क्रिकेट संघातील मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज हरमनप्रीत कौर हिची पंजाब पोलिस दलात DYSP पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि डीजीपी सुरेश अरोरा यांच्या उपस्थितीत हरमनने नवनियुक्त पदाचा पदभार संभाळला. मुख्यमंत्री व डीजीपींनी तिच्या वर्दीला स्टार लावले. याक्षणी हरमनप्रीत एकदम आनंदी दिसत होती. यावेळी तिचे कुटुंबिय तेथे उपस्थित होते. कोण आहे हरमनप्रीत कौर...

 

- हरमनप्रीत पंजाबमधील मोगा येथील राहणारी आहे. तिचा जन्म 8 मार्च 1989 रोजी झाला. 
- उजव्या हाताने फलंदाजी करणारी हरमनप्रीत गोलंदाजीही करते. 
- तिने 64 वनडे मॅचेसमध्ये 1632 धावा आणि 68 टी-20 मॅचेसमध्ये 1223 धावा केल्या आहेत. 
- हरमनप्रीत ऑस्ट्रेलियात होणा-या महिला बिग बॅश टी-20 लीग खेळणारी पहिली भारतीय महिला प्लेयर आहे. 
- जून 2016 मध्ये तिला बिग बॅश लीगमधील टीम सिडनी थंडरने साईन केले आहे.

- सध्या ती भारतीय टी-20 संघाचे नेतृत्त्व करते.

 

जिद्दी हरमनप्रीत DYSP झालीच-

 

- हरमनप्रीत कौरने 2011 मध्ये पंजाब पोलिस दलात DYSP पदासाठी अर्ज दिला होता. मात्र, तिला रिजेक्ट करण्यात आले होते. 
- महिला क्रिकेटर्ससाठी पंजाब पोलिस दलात नोकरीची व्यवस्था नाही तसेच तू काही हरभजन सिंग वगैरे नाही असे सांगत तिचा एकप्रकारे अपमान केला होता.
- हरभजन सिंगला 2009 साली पंजाब पोलिस दलात डीवायएसी पदावर नियुक्त केले होते.
- भारतात पुरूषाचे क्रिकेट प्रसिद्ध आहे. त्या तुलनेत महिला क्रिकेटला फारसे महत्त्व दिले जात नाही.
- मात्र, गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वकरंडक स्पर्धेत हरमनप्रीत कौरने जबरदस्त कामगिरी करत भारताला अंतिम फेरीत पोहचवले होते.
- अलीकडच्या काळात महिला क्रिकेटचे सामने लाईव्ह दाखवले जात आहेत. त्यामुळे भारतातील क्रिकेट रसिकही महिला क्रिकेटर्संना ओळखू लागले आहेत.
- भारतीय महिला क्रिकेट संघातील हरमनप्रीत आघाडीची खेळाडू आहे. तिच्या गुणवत्तेचा अंदाज आपण यावरून बांधू शकतो की, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश क्रिकेट स्पर्धेत खेळणारी ती पहिली आणि एकमेव क्रिकेटर ठरली होती.
- पंजाबमध्ये गेल्या वर्षी अकाली दल-भाजपचे सरकार जाऊन काँग्रेसचे सरकार आले. त्यामुळे काँग्रेसचे मुख्यमंत्री व लष्करात कॅप्टन राहिलेल्या अमरिंदर सिंग यांना खेळाप्रती विशेष आदर आहे. त्यामुळे त्यांनी हरमनप्रीतला DYSP पदी नियुक्ती देऊन बाजी मारली. 

- डीवायएसपी बनल्यानंतर हरमनचे वडिल हरमनंदर सिंग भुल्लर यांनी सांगितले की, 2011 साली पोलिस दलात नियुक्ती नाकारल्यानंतर हरमन नाराज झाली होती. मात्र, माझ्या कामगिरीने मी एक दिवस पंजाब पोलिस दलात डीवायएसपी पदावर पोहचेन अशी जिद्द व्यक्त केली होती. अखेर तिने तिची जिद्द पूर्ण करून दाखवली.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, हरमनप्रीत कौरची पर्सनल लाईफ....

बातम्या आणखी आहेत...