आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा 35 वर्षांत अाठवा वर्ल्डकप; अाॅस्ट्रेलिया टीमचा 8 गड्यांनी केला पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माऊंट-  मुंबईचा युवा सुपरस्टार पृथ्वी शाॅच्या नेतृत्वाखाली भारताचे युवा विश्वविजेते ठरले. भारताने शनिवारी चाैथ्यांदा वर्ल्डकप जिंकला. भारताच्या युवांनी फायनलमध्ये तीन वेळच्या विश्वविजेत्या अाॅस्ट्रेलियन युवांवर ८ गड्यांनी मात केली.  यासह भारताने ३५ वर्षांत ओव्हरऑल आठव्या विश्वचषकावर नाव काेरले.  


दिल्लीचा युवा फलंदाज मनज्याेत कार्लाच्या (१०१) नाबाद शतकाच्या बळावर भारताने ३८.५ षटकांत विजयाची नाेंद केली. यासह भारताचे युवा चाैथ्यांदा विश्वचषकाचे मानकरी ठरले. यापूर्वी, भारताने २०००, २००८ व २०१२ मध्ये वर्ल्डकप ट्राॅफी पटकावली हाेती. यंदा उल्लेखनीय कामगिरी करणारा भारताचा  शुबमान प्लेअर अाॅफ द सिरीजचा मानकरी ठरला.  पाेरल (२/३०), शिवा सिंग (२/३६), कमलेश नागरकाेटी (२/४१) अाणि अनुकल राॅय (२/३२) यांनी धारदार गाेलंदाजी करताना प्रथम फलंदाजी करणाऱ्या अाॅस्ट्रेलियाला ४७.२ षटकांत अवघ्या २१६ धावांत राेखले. प्रत्युत्तरात भारताने दाेन गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले.

 

मनज्याेतचे झंझावाती शतक 
भारताकडून  मनज्याेत कार्ला अंतिम सामन्यात चमकला. त्याने अाॅस्ट्रेलियन गाेलंदाजी फाेडून काढताना झंझावाती शतक ठाेकले. त्याने १०२ चेंडूंचा सामना करताना ८ चाैकार अाणि ३ षटकारांच्या अाधारे नाबाद १०१ धावांची खेळी केली. 

 

पृथ्वी-मनज्याेतची भागीदारी 
कर्णधार व सलामीवीर पृथ्वी शाॅने भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. यासाठी त्याला मनज्याेतची माेलाची साथ मिळाली. या दाेघांनी अाॅस्ट्रेलियन गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना सामन्यात पहिल्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी रचली.

 

अनुकूल विकेटमध्ये अव्वल 
भारताचा अनुकूल राॅय यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अव्वल गाेलंदाज ठरला. त्याने  एकूण १४ विकेट घेतल्या.  त्याने सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या यादीत अव्वल स्थान गाठले. याच गटात अफगाणिस्तानचा अहमद व कॅनडाचा फैसाल प्रत्येकी १४ विकेटसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर अाहेत.

 

> विश्वविजेत्या युवांवर काैतुकाचा वर्षाव

पंतप्रधानांकडून युवा टीमला खास शुभेच्छा
‘युवांची ही कामगिरी अभिमानास्पद अाहे,’अशा शब्दांत राष्ट्रपती काेविंद यांनी  काैतुकाचा वर्षाव केला. त्यांनी  टीमला या शुभेच्छा दिल्या. ‘युवांची कामगिरी गाैरवशाली ’असे पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले. यासह त्यांनी टीमला शुभेच्छाही दिल्या.

 

सचिन, कपिलदेवने उधळली स्तुतिसुमने 
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अाणि माजी कर्णधार कपिलदेवनेही विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंवर स्तुतिसुमने उधळली. युवांची ही कामगिरी काैतुकास्पद अाहे, अशा शब्दांत सचिनने काैतुक केले. तसेच सेहवागनेही टीमचे  खास काैतुक केले. 

 

 

अानंद शब्दबद्ध करणे कठीण : पृथ्वी शाॅ
विश्वचषक जिंकल्यानंतरचा अानंद शब्दात कथन करणे फार कठिण अाहे. सर्वांची स्वप्नपुर्ती करताना मला माेठा अानंद झाला. हे यश सर्वांचेच अाहे. यासाठी  खेळाडूने प्रचंड मेहनत घेतली अाहे,असे युवा टीमचा कर्णधार पृथ्वी विजयानंतर म्हणाला. 

 

अातापर्यंतची जेतेपदाची कामगिरी
२००० भारत (माे. कैफचे नेतृत्व) श्रीलंकेवर ६ गड्यांनी मात    
२००८ भारत (काेहलीचे नेतृत्व) अाफ्रिकेवर १२ धावांनी मात    
२०१२ भारत (उन्मुक्तचे नेतृत्व) अाॅस्ट्रेलियावर ६ गड्यांनी मात    
२०१८ भारत (पृथ्वीचे नेतृत्व) अाॅस्ट्रेलियावर ८ गड्यांनी मात
 
सहा वर्षांनंतर अाॅस्ट्रेलियावर मात 
भारताच्या युवांनी गत २०१२ च्या वर्ल्डकपमधील कामगिरीला उजाळा दिला. यातून भारताने सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा अाॅस्ट्रेलियाच्या युवांंना वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धूळ चारली. भारताने अाता ८ गड्यांनी मात केली. त्यादरम्यान २०१२ मध्ये भारताने ६ गड्यांनी अाॅस्ट्रेलियाला हरवले हाेते. 
 
हेही महत्त्वाचे 
-  वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा विक्रमी विजय
- फायनलमधील शतकवीर मनज्याेत दुसरा भारतीय 
- तिसऱ्यांदा भारताने अजेय राहताना जिंकली ट्राॅफी
- युवांच्या वर्ल्डकपमध्ये चाैथ्यांदा भारताची अाॅस्ट्रेलियावर मात. लीग सामन्यातही विजयी.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा,फायनलमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नऊ राज्यांचे युवा...
बातम्या आणखी आहेत...