आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया उतरणार अाज मैदानावर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलंबाे- सलग मालिका विजयाने सध्या टीम इंडिया जबरदस्त फाॅर्मात अाहे. अाता श्रीलंकेतील अायसीसीच्या टी-२० तिरंगी मालिका विजयाचे मिशन पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक अाहे. याच मालिका विजयाच्या इराद्याने राेहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ  मैदानावर उतरणार अाहे.  अाज मंगळवारपासून श्रीलंकेमध्ये टी-२० च्या तिरंगी मालिकेला सुरुवात हाेत अाहे. या मालिकेच्या सलामीला यजमान श्रीलंका अाणि टीम इंडिया समाेरासमाेर असतील. या स्पर्धेत भारत, श्रीलंकेसह बांगलादेश टीमचाही समावेश अाहे.   


सिनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये भारताचा संघ या मालिकेमध्ये अापले काैशल्यपणास लावणार अाहे. यासाठी युवा सलामीवीर राेहित शर्माकडे टीमच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात अाली. अाता अापल्या नेतृत्वाखाली या पहिल्यांदा सहभागी हाेणाऱ्या मालिकेची ट्राॅफी टीमला मिळवून देण्याचा राेहितचा प्रयत्न असेल. या वेळी टीम इंडियाच्या विजयाची मदार युवा खेळाडूंूवर असेल. अापल्या मालिका विजयाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय संघाने साेमवारी कसून सराव केला.   

यजुवेंद्र, शार्दूल, जयदेववर सर्वांची नजर 
राेहित शर्मा हा अापल्या युवांच्या उपस्थितीमध्ये मालिकेत काैशल्यपणास लावणार अाहे. यामध्ये सर्वांची नजर फाॅर्मात असलेल्या गाेलंदाज यजुवेंद्र चहल, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकत यांच्यावर असेल.  यजुवेंद्र चहलने निवड समितीचा विश्वास सार्थकी लावताना   विजयात माेलाचे याेगदान दिले.   

 

संभाव्य संघ 

 

भारत : राेहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लाेकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, वाॅशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकत, माे. सिराज, ऋषभ पंत.  
श्रीलंका : दिनेश चांदिमल (कर्णधार), सुरंगा लकमल, उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलका, कुशल मेंडिस, दासून शनाका, कुशल परेरा, तिसारा परेरा, जीवन मेंडिस, इसुरू उदाना, अकिला धनंजया, अामिलाे अापाेन्साे, नुवान प्रदीप, चामिरा, डिसिल्वा.

 

भारताचा लंकेत दबदबा 
भारतीय संघाचा श्रीलंकेतील मैदानावर दबदबा राहिला अाहे. गत वर्षी काेहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने येथील मैदानावर  विजयामध्ये सातत्य कायम ठेवताना यजमान श्रीलंकेविरुद्धच्या कसाेटी, वनडे अाणि टी-२० सिरीज अापल्या नावे केल्या हाेत्या. त्यामुळे येथील मैदानावरील अापले वर्चस्व कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

 

बातम्या आणखी आहेत...