आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: मुंबई संघाला प्ले अाॅफची संधी; पंजाब टीमवर राेमहर्षक विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कीरोन पोलार्डने आपल्‍या खेळीमध्‍ये 5 चौकार व 3 षटकार लगावले. - Divya Marathi
कीरोन पोलार्डने आपल्‍या खेळीमध्‍ये 5 चौकार व 3 षटकार लगावले.

मुंबई-  राेहित शर्माच्या कुशल नेतृत्वाच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने राेमहर्षक विजयाची नाेंद करताना अायपीएलमधील अापले अाव्हान कायम ठेवले. अटीतटीच्या सामन्यात मुंबईने अापल्या घरच्या मैदानावर अश्विनच्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली.

 

मुंबईने ३ धावांनी सामना जिंकला. जसप्रीत बुमराह (३/१५) अाणि मॅक्लीनघनच्या (२/३७) धारदार गाेलंदाजीच्या बळावर मुंबईने ही विजयश्री खेचून अाणली. या विजयाच्या बळावर मुंबईला अाता प्ले अाॅफ प्रवेशाची संधी अाहे. या विजयाने अाता मुंबई संघाने चाैथे स्थान गाठले. पराभवामुळे पंजाब संघाचे स्वप्न भंगले. पाेलार्डच्या अर्धशतकामुळे मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १८६ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात पंजाबला ५ गड्यांच्या माेबदल्यात १८३ धावांपर्यंत मजल मारता अाली.


बुमराह सामनावीर : धारदार गाेलंदाजी करत ३ विकेट घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीरचा मानकरी ठरला.

 

पाेलार्डचा झंझावात
मुंबई इंडियन्सकडून पाेलार्डने तुफानी खेळी केली. त्याने शानदार खेळी करताना अर्धशतकाची नाेंद केली. त्याने २३ चेंडूंचा सामना करताना ५ चाैकार अाणि ३ षटकारांच्या अाधारे ५० धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईला माेठी धावसंख्या उभी करता अाली.


लाेकेशचे अर्धशतक व्यर्थ
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा युवा फलंदाज लाेेकेश राहुलने सत्रातील अापली झंझावाती खेळी कायम ठेवताना अर्धशतक झळकावले. त्याचे सत्रातील हे पाचवे अर्धशतक अाहे. त्याने ६० चेंडूंचा सामना करताना १० चाैकार अाणि ३ षटकारांच्या अाधारे ९४ धावांची खेळी केली. अवघ्या सहा धावांनी त्याचे शतक हुकले. त्याच्या नावे अाता सर्वाधिक ६५२ धावा झाल्या अाहेत. यात पाच अर्धशतकांचा समावेश अाहे. त्यामुळे त्याला दबदबा कायम ठेवता अाला.

बातम्या आणखी आहेत...