आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायना, सिंधू, श्रीकांतने दिली विजयी सलामी; अाशियाई चॅम्पियनशिप; अर्जुन-श्लाेक दुसऱ्या फेरीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वुहान - राष्ट्रकुल चॅम्पियन सायना नेहवाल, राैप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधू अाणि के. श्रीकांतने मंगळवारी अाशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील पदकांच्या अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. भारताच्या या तिन्ही अनुभवी खेळाडूंनी स्पर्धेत अापापल्या गटात विजयी सलामी दिली. दुसरीकडे अर्जुन अाणि श्लाेकनेही सलामी देत दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.मात्र, साैरभ शर्मा अाणि अनुष्का पारिखला पराभवाचा सामना करावा लागला.  


रिअाे अाॅलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत चीन-तैपेईच्या पाई यूवर मात केली. तिने २१-१४, २१-१९ अशा फरकाने सलामीचा सामना जिंकला. यासह तिला दुसरी फेरी गाठता अाली.  सिंधूचा दुसरा  सामना शियाअाेशिनसाेबत हाेईल.

 

सायनाची सहज मात 

भारताच्या बिगरमानांकित सायना नेहवालने महिला एकेरीत अवघ्या ३३ मिनिटांत विजयी सलामी दिली. तिने सलामीच्या सामन्यात सिंगापूरच्या जिअाे जियाचा पराभव केला. तिने २१-१२, २१-९ अशा फरकाने सहज एकतर्फी विजयाची नाेंद केली. अाता तिचा दुसऱ्या फेरीतील सामना चीनच्या गाअाेशी हाेईल. 

 

श्रीकांत २-१ ने  विजयी

भारताच्या के. श्रीकांतने पुरुष एकेरीचा सलामी सामना जिंकला. त्याने जपानच्या केंता निशिमाेताेला पराभूत केले. त्याने १३-२१, २१-१६, २१-१६ अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन केला. यासह त्याला अापल्या माेहिमेची दमदार सुरुवात करता अाली.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...