Home | Sports | From The Field | Signs of increasing the number of BCCI members

बीसीसीआयची सदस्य संख्या वाढण्याचे संकेत; नवसंजीवनी मिळणार

विनायक दळवी | Update - May 06, 2018, 04:28 AM IST

गेली पाच वर्षे सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या देशांतर्गत क्रिकेटचे मंथन लवकरच पूर्णत्वास येईल, अशी चिन्हे दिसायला लाग

 • Signs of increasing the number of BCCI members

  मुंबई - गेली पाच वर्षे सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या देशांतर्गत क्रिकेटचे मंथन लवकरच पूर्णत्वास येईल, अशी चिन्हे दिसायला लागली आहेत. मुंबई, बडोदे, सौराष्ट्र, महाराष्ट्र अशी क्रिकेट संघटनांच्या पूर्वापार चालत आलेल्या रूढींचा, संस्कृतीचा परिणाम भारतीय क्रिकेटवर निश्चितच जाणवतो. त्याचाच परिणाम म्हणून ‘एक राज्य एक मत’ या संकल्पनेला काहीसा छेद देत महाराष्ट्र व गुजरात राज्यांमधील संघटनांचे मतांचे अस्तित्व अबाधित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


  बीसीसीआयच्या स्थापनेआधी म्हणजे १९३० पासून अस्तित्वात आणि कार्यरत असणाऱ्या अनेक संघटनांची क्रिकेटची पाळेमुळे घट्ट आहेत. देशालाविश्वविख्यात क्रिकेटरला देणारी क्रिकेटची खाण मुंबई आहे. बडोदे, सौराष्ट्र, चार राजघराण्यांनी क्रिकेट या खेळाचे जतन केले. दुलीपसिंह, रणजितसिंह यांच्यासारख्या क्रिकेटरत्नांची गुजरात भूमी; आज अहमदाबाद येथील कित्येक करोडो रुपयांनी आकाराला येत असलेल्या एक लाख प्रेक्षकक्षमतेच्या भारतातील सर्वोत्तम स्टेडियमच्या अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सर्वेसर्वा अमित शहा यांच्या अथक प्रयत्नांनी अहमदाबाद येथे साक्षात प्रत्यक्षात अवतरले.


  अशा परिस्थितीत गुजरातमधील दोन ऐतिहासिक संघटना बडोदे व सौराष्ट्र आणि तिसऱ्या गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अस्तित्व अबाधित राहणे क्रमप्राप्त होते.
  मुंबई ही तर भारतीय क्रिकेटची ‘मक्का’ आहे. महाराष्ट्र क्रिकेटलाही प्राचीन परंपरा आहे. विदर्भने आताच रणजी विजेतेपदही पटकावले आहे.

  नवसंजीवनी मिळणार
  पदाधिकाऱ्यांच्या ३-३ वर्षांच्या कार्यकालावधीत अखंडता असावी याबाबतही न्यायालयाचा दृष्टिकोन मवाळ दिसत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीपूर्वीच भारतीय क्रिकेटला न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतर नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा आहे.

Trending