Home | Sports | From The Field | IPL FINAL 2018 Chennai Super Kings V/S Sunrisers Hyderabad News And Updates

IPL: सर्वात बुजुर्ग संघ चेन्नई 7 वर्षांनी पुन्हा चॅम्पियन; हैदराबादला हरवून मुंबईशी बरोबरी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 28, 2018, 07:37 AM IST

दाेन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघ अाता तिसऱ्यांदा अायपीएलचा किताब जिंकण्यासाठी उत्सुक अाहे.

 • IPL FINAL 2018 Chennai Super Kings V/S Sunrisers Hyderabad News And Updates

  मुंबई- चेन्नई सुपरकिंग्ज २ वर्षांच्या बंदीनंतर परतली, ती विजयासाठीच. ३४ वर्षांचे सरासरी वयोमान असलेल्या चेन्नई संघाने मुंबईत हैदराबादला ८ गड्यांनी हरवून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. तसेच मुंबई इंडियन्सशीही बरोबरी साधली. चेन्नई चेन्नई २०१० व २०११ मध्ये विजयी झाली होती. हा विजय ७ वर्षांनी मिळाला. अंतिम लढतीत शेन वॉटसन चमकला. त्याने ११७ धाव केल्या. याआधी २०१४ च्या फायनलमध्ये वृद्धिमान साहाने शतक ठोकले होते.

  शेन वाॅटसनच्या (नाबाद ११७) झंझावाती शतकाच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने रविवारी ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग (अायपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेचा किताब पटकावला. चेन्नई सुपरकिंग्ज संघाने फायनलमध्ये २०१५ च्या चॅम्पियन सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. कर्णधार महेंद्रसिंग धाेनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या टीमने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ८ गड्यांनी अंतिम सामना जिंकला. यासह चेन्नईने सात वर्षांनंतर चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. तसेच चेन्नई सुपरकिंग्जचा संघ तिसऱ्यांदा किताबाचा मानकरी ठरला. पराभवामुळे विलियम्सनच्या हैदराबादला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

  प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने ६ बाद १७८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने १८.३ षटकांत २ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. संघाच्या विजयासाठी वाॅटसनने तुफानी खेळी केली. त्यामुळे चेन्नईला विजयाचे लक्ष्य गाठता अाले. यासह चेन्नई संघाने जेतेपदावर नाव काेरले. दरम्यान, चेन्नईला राेखण्याचा हैदराबादच्या युवा गाेलंदाजांचा प्रयत्न अपयशी ठरला.

  एनगिडी, भुवनेश्वरची निर्धाव षटके : अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जच्या एनगिडी अाणि हैदराबाद संघाच्या भुवनेश्वर कुमारने निर्धाव षटके टाकली.

  सामनावीर वाॅटसनच्या नाबाद ११७ धावा

  चेन्नईच्या सुपरकिंग्ज शेन वाॅटसनने सत्रात दुसऱ्या शतकाची नाेंद केली. त्याने फायनलमध्ये हैदराबाद संघाविरुद्ध ५७ चेंडूंत ११ चाैकार अाणि ८ षटकारांच्या अाधारे नाबाद ११७ धावा काढल्या. यासह त्याने टीमचा विजय निश्चित केला. यापूर्वी त्याने २१ एप्रिल राेजी राजस्थानविरुद्धही शतक ठाेकले हाेते. त्याने झंझावाती १०६ धावांची खेळी केली. त्याने ५७ चेंडूंचा सामना करताना ९ चाैकार अाणि ६ षटकारांसह १०६ धावा काढल्या हाेत्या.

  विलीयम्सन, युसुफ पठाणची खेळी व्यर्थ
  हैदराबाद संघाचा कर्णधार विलीयम्सन अाणि युसुफ पठाणने तुफानी फटकेबाजी केली. विलीयम्सनने ३६ चेंडूंचा सामना करताना ५ चाैकारांसह २ षटकार ठाेकून ४७ धावा काढल्या. त्याला कर्ण शर्माने बाद केले. तसेच युसुफने नाबाद ४५ धावांची खेळी केली.

  धोनी-चेन्नई साेबत असल्यास टीम शानदार : चेन्नई संघ दाेन वर्षाच्या बंदीनंतर पुन्हा अायपीएलमध्ये उतरला हाेता. या संघाची ही नववी स्पर्धा अाहे. प्रत्येक वेळी धाेनी कर्णधार राहिला अाणि प्रत्येक वेळी टीम प्ले अाॅफमध्ये.

  चेन्नई म्हणजे डेड अार्मी : सरासरी वय ३४ वर्षे, ११ खेळाडू ३० वर्षांहून अधिक. या टीमला ‘डेड अार्मी’ म्हणून हिणवायचे. तरीही लीग राउंडमध्ये ८२.७ % कॅच पकडले.

  धोनी अाठव्यांदा व रैना सातव्यांना फायनलमध्ये: धोनी व रैना सातव्यांदा चेन्नईकडून फायनलमध्ये खेळले. धाेनी एकदा पुणे संघाकडून फायनलपर्यंत पाेहाेचला.

  चेन्नईची मुंबईशी बराेबरी
  महेंद्रसिंग धाेनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज संघाने यंदाच्या अायपीएलचा किताब पटकावला. यासह चेन्नईचा संघ तिसऱ्यांदा या ट्राॅफीचा मानकरी ठरला. त्यामुळे अाता चेन्नईच्या नावे तिसऱ्या जेतेपदाची नाेंद झाली. अायपीएलचे तीन वेळा अजिंक्यपद पटकावून चेन्नई संघाने मुंबई इंडियन्सची बराेबरी साधली. त्यामुळे अाता मुंबईपाठाेपाठ चेन्नई संघ तीन वेळा अायपीएलचा चॅम्पियन ठरला अाहे.

  ...अाणि वर्ल्डकपच्या अाठवणींना उजाळा! : नाणेफेकदरम्यान संजय मांजरेकर अाणि चेन्नईचा कर्णधार धाेनी यांच्यातील संवादाने २०११ च्या वर्ल्डकपमधील अाठवणींना उजाळा दिला. रविवारी नाणेफेकच्या वेळी विलियम्सनने टेल मागितले. त्या वेळी मांजरेकर धाेनीला म्हणाला की, तू हेड मागितलेस. त्यावर उत्तर देताना धाेनी म्हणाला की नाही. कर्णधार विलियम्सनने टेल मागितले. यावरून त्यांच्यात विनाेदाचा संवाद रंगला. त्यामुळे दाेघांमधील हास्यविनाेदाने सर्वांचे लक्ष वेधले.

  पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, या सामन्‍यातील व आयपीएलमधील इतर रोचक बाबी...

  चेन्‍नईतर्फे शेन वॉटसनने शानदार फलंदाजी करताना 51 चेंडूत शतक पुर्ण केले.
 • IPL FINAL 2018 Chennai Super Kings V/S Sunrisers Hyderabad News And Updates

Trending