Home | Sports | From The Field | IPL: KKR vs SRH; The final match will be played with Chennai Super Kings

IPL: कोलकाता देणार हैदराबादला टक्कर; चेन्नई सुपरकिंग्जसोबत रंगणार फायनल लढत

वृत्तसंस्था | Update - May 25, 2018, 03:28 AM IST

आयपीएलच्या ११ व्या सत्रातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्सचे हैदराबाद समोर कोलकाता नाइट रायडर्सचे तगडे आव्हान असण

 • IPL: KKR vs SRH; The final match will be played with Chennai Super Kings

  नवी दिल्ली - आयपीएलच्या ११ व्या सत्रातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्सचे हैदराबाद समोर कोलकाता नाइट रायडर्सचे तगडे आव्हान असणार आहे. हा सामना ईडन गार्डनच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. या दोन्ही संघातील विजेती टीम शुक्रवारी महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबईत किताबासाठी एकमेकांसमोर उभे राहतील.


  हैदराबाद टीम गटात १४ सामन्यांनंतर अव्वल राहिला होता. मात्र अखेरच्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यात कोलकाता विरुद्ध पहिल्या क्वालिफायरमध्ये दोन गड्यांनी झालेल्या पराभवाचा समावेश आहे. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वातील कोलकाताने गत चारही सामने जिंकले आहेत. यात क्वालिफायर दोनमध्ये राजस्थान रॉयल्सवर मिळालेल्या २५ धावांच्या विजयाचा समावेश आहे.

  मुंबईविरुद्ध मिळालेल्या १०२ धावांच्या मोठ्या पराभवानंतर कोलकाताने पुन्हा मागे वळून पाहिले नाही.बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाताने ५१ धावांवर ४ गडी गमावल्यानंतर आंद्रे रसेलने २५ चेंडूंत ४९ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या जोरावर ७ बाद १६९ धावा केल्या. त्यानंतर राजस्थानला २५ धावांनी पराभूत करत क्वालिफायर दोनमध्ये प्रवेश केला. ईडन गार्डनवर हैदराबादने कोलकात्याला ५ गड्यांनी पराभूत केले आहे.

  नाणेफेक महत्त्वाची
  आजच्या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही संघाकडे फिरकीपटू ईडन गार्डनवर किती विकेट घेतात त्यावर निकाल अवलंबून आहेत. खेळपट्टीवर चेंडू वळण्याची जास्त शक्यता आहे, मैदानावर दव असल्याची देखील अाशा आहे. ज्यामुळे जो संघ नाणेफेक जिंकेल तो फलंदाजीला प्रथम प्राधान्य देऊ शकतो. त्या संघाला फायदा होईल.

  हैदराबादची गोलंदाजी मजबूत
  हैदराबादची गोलंदाजी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट राहिली आहे. त्यांच्याकडे विविध प्रकारचे गोलंदाज आहेत. चेन्नई विरुद्ध सामन्यात भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल आणि राशिद खानने शानदार गोलंदाजी केली होती. राशिदने त्या सामन्यात ४ षटकांत केवळ ११ धावा दिल्या होत्या. कोलकाताला आता त्याच्यापासून सावधान राहावे लागेल.

  विल्यम्सन, बेथवेटवर मदार
  हैदराबादची मदार कर्णधार केन विल्यम्सन स्वत: सांभाळेल. केनने १५ सामन्यात आतापर्यंत ६८५ धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे युवा फलंदाज कार्लोस ब्रेथवेट देखील फाॅर्मात आला आहे. ज्याने गेल्या सामन्यात फलंदाजी बरोबर गोलंदाजी देखील जबरदस्त कामगिरी केली होती.

  संभाव्य संघ

  कोलकाता नाइट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नरेन, क्रिस लिन, रॉबिन उथप्पा, मिशेल जॉन्सन, पीयूष चावला, कुलदीप यादव, शुभमन गिल, इशांक जग्गी, नितीश राणा, विनय कुमार, अपूर्व वानखेडे, रिंकू सिंग, शिवम मावी, प्रसिद्ध कृष्णा.

  सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, शिखर धवन, शाकिब अल हसन, मनीष पांडे, कार्लोस ब्रेथवेट, युसूफ पठाण, वृद्धिमान सहा, राशिद खान, दीपक हुड्डा, सिद्धार्थ कौल, मोहमंद नबी, बासिल थम्पी, संदीप शर्मा, बिपुल शर्मा, मेहंदी हसन, अॅलेक्स हेल्स.

Trending