Home | Sports | From The Field | IPL: Kolkata Knight Riders win Rajasthan Royals; win by 8 wickets

IPL: कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान रॉयल्सवर विजय, 8 गड्यांनी केली मात; रँकिंगमध्‍ये अव्‍वल

वृत्तसंस्था | Update - Apr 19, 2018, 06:46 AM IST

आयपीएलच्या ११ व्या सत्रात बुधवारी कर्णधार दिनेश कार्तिकने शानदार षटकार खेचत आपल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयी केल

 • IPL: Kolkata Knight Riders win Rajasthan Royals; win by 8 wickets

  जयपूर- आयपीएलच्या ११ व्या सत्रात बुधवारी कर्णधार दिनेश कार्तिकने शानदार षटकार खेचत आपल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयी केले. कोलकताने राजस्थान रॉयल्सवर ८ गड्यांनी मात केली.


  सलामीवीर सुनील नरेनने २५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचत ३५ धावा केल्या. दुसरा सलामीवीर क्रिस लीन भोपळाही फोडू शकला नाही. रॉबिन उथप्पाने फटकेबाजी करत ३६ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार आणि २ षटकार खेचत ४८ धावा काढल्या. नितीश राणाने नाबाद आणि कर्णधार दिनेश कार्तिकने नाबाद धावांची विजयी खेळी केली. कोलकाताच्या के. गौतमने २३ धावांत २ गडी बाद केले.


  तत्पूर्वी, राजस्थानच्या कर्णधार अजिंक्य राहणे व शॉट बळावर राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ८ बाद १६० धावा उभारल्या. सलामीवीर कर्णधार अजिंक्य रहाणेने १९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचत ३६ धावा केल्या. त्याला नितीश राणाने कर्णधार दिनेश कार्तिकच्या हाती यष्टिचीत केले. दुसरा सलामीवीर शॉटने ४४ धावा ठोकल्या. राहुल त्रिपाठीने १५, बेन स्टोक्सने १४ धावा जोडल्या. बटलरने २४, गौतमने १२ धावा केल्या. कोलकाताच्या नितीश राणा आणि कुरण यांनी प्रत्येकी २ गडी बाद केेले. पीयूष चावला, कुलदीप यादव, शिवम मावीने प्रत्येक एक बळी घेतला.

  राणा सामनावीर
  युवा अष्टपैलू खेळाडू नितीश राणा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने गोलंदाजी भेदक मारा करत २ षटकांत ११ धावांत २ बळी घेतले. फलंदाजीत २७ चेंडूचा सामना करताना २ चौकार व षटकार लगावत नाबाद ३५ धावांची विजयी खेळी केली.

  पुढील स्लाईडवर पहा धावफलक ....

 • IPL: Kolkata Knight Riders win Rajasthan Royals; win by 8 wickets
 • IPL: Kolkata Knight Riders win Rajasthan Royals; win by 8 wickets

  नितीश राणा आणि दिनेश कार्तिक यांनी 61 धावांची भागिदारी करून टीमला विजय मिळवून दिला.

   

 • IPL: Kolkata Knight Riders win Rajasthan Royals; win by 8 wickets

  रॉबिन उथप्‍पा आणि सुनिल नरेन यांनी दुस-या विकेटसाठी 50 धावांची भागिदारी केली.


   

 • IPL: Kolkata Knight Riders win Rajasthan Royals; win by 8 wickets

  राजस्‍थानचा कर्णधार अजिंक्‍य रहाणेने चौथ्‍या ओव्‍हरमध्‍ये सलग  4 चौकार लगावले.

 • IPL: Kolkata Knight Riders win Rajasthan Royals; win by 8 wickets

Trending