Home | Sports | From The Field | IPL: Rajasthan royal won the match

IPL: राजस्थानने पंजाबची एक्स्प्रेस राेखली; राजस्थान राॅयल्सने नाेंदवला चाैथा विजय, बटलर सामनावीर

वृत्तसंस्था | Update - May 09, 2018, 06:55 AM IST

पराभवाची मालिका खंडित करताना राजस्थान राॅयल्स संघाने ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (अायपीएल) शानदार विजयाच

 • IPL: Rajasthan royal won the match

  जयपूर - पराभवाची मालिका खंडित करताना राजस्थान राॅयल्स संघाने ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (अायपीएल) शानदार विजयाची नाेंद केली. राजस्थान संघाने मंगळवारी सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली. राजस्थानने घरच्या मैदानावर १५ धावांनी सामना जिंकला. सहा पराभवानंतर राजस्थानने लीगमध्ये चाैथ्या विजयाची नाेंद केली.

  पंजाबच्या टीमचा लीगमधील हा चाैथा पराभव ठरला. संघाच्या विजयात युवा गाेलंदाज गाेवथामने (२/१२) माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे राजस्थान संघाने सलगच्या विजयाने फाॅर्मात असलेल्या पंजाबच्या माेहिमेला ब्रेक लावला.


  सामनावीर जाेस बटलरच्या (८२) झंझावाती खेळीच्या बळावर राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघाला ७ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या १४३ धावांपर्यंत मजल मारता अाली. राजस्थानच्या युवा गाेलंदाजांच्या सुरेख खेळीमुळे पंजाबच्या विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला. अार्चरसह जयदेव उनाडकत, स्टाेक्स व ईश साेढीने विजयात प्रत्येकी एका विकेटचे याेगदान दिले.

  सामनावीर बटलरचे झंझावाती अर्धशतक
  राजस्थानकडून सामनावीर जाेस बटलरने शानदार फलंदाजी केली. त्याने ५८ चेंडूंचा सामना करताना ९ चाैकार व एका षटकाराच्या अाधारे ८२ धावांची खेळी केली.यामुळे राजस्थानला माेठी धावसंख्या उभी करता अाली.

  पंजाबचा सलामीवीर लाेकेश राहुलची झंुज व्यर्थ
  पंजाबच्या विजयासाठी लाेकेश राहुलने एकाकी झुंज देताना नाबाद ९५ धावांची खेळी केली. मात्र, त्याला अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. त्याने ७० चेंडूंचा सामना करताना ११ चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे ही खेळी केली. त्याचे हे सलग नाबाद दुसरे अर्धशतक ठरले.

  पुढील स्लाईडवर पहा सामन्याचे धावफलक.....

 • IPL: Rajasthan royal won the match

Trending