Home | Sports | From The Field | IPL, Shubhaman Gil's first half-century in IPL

IPL: चेन्नईला हरवून कोलकत्ता तिसऱ्या क्रमांकावर, शुभमन गिलचे IPL मध्ये पहिले अर्धशतक

वृत्तसंस्था | Update - May 04, 2018, 01:19 AM IST

विश्वविजेत्या भारतीय संघाचा युवा सदस्य खेळाडू शुबमान गिलने ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्येही (अायपीएल) तुफानी

 • IPL, Shubhaman Gil's first half-century in IPL

  काेलकाता - विश्वविजेत्या भारतीय संघाचा युवा सदस्य खेळाडू शुबमान गिलने ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्येही (अायपीएल) तुफानी फटकेबाजी केली. यासह त्याने अापल्या काेलकाता नाइट रायडर्स संघाला शानदार विजय मिळवून दिला. त्याच्या अर्धशतकाच्या बळावर यजमान काेलकाता संघाने अापल्या एेतिहासिक ईडन गार्डन मैदानावर धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. काेलकाता संघाने १७.४ षटकांत ६ गड्यांनी सामना जिंकला. यासह काेलकाता संघाने अापल्या नावे पाचव्या विजयाची नाेंद केली. चेन्नईच्या संघातील लीगमधील हा तिसरा पराभव ठरला.


  धाेनीच्या चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात काेलकाता संघाने ४ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. संघाच्या विजयात युवा फलंदाज शुबमान गिलसह कर्णधार दिनेश कार्तिकने माेलाचे याेगदान दिले. त्यांनी चेन्नईची सुमार गाेलंदाजी फाेडून काढताना विजयश्री खेचून अाणली.


  सामनावीर नरेन चमकला
  काेलकाता संघाच्या विजयात सामनावीर गाेलंदाज सुनील नरेन अाणि पीयूष चावलाने माेलाचे याेगदान दिले. या दाेघांनी धारदार गाेलंदाजी करताना प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या. तसेच कुलदीप यादवने एक गडी बाद केला. त्यामुळे चेन्नईचा माेठ्या खेळीचा प्रयत्न अपुरा राहिला. धाेनीने नाबाद ४३ धावांची खेळी केली.

  शुबमानचे पहिले अर्धशतक
  यंदाच्या सत्रात शुबमान गिलने अायपीएलमध्ये पहिल्या अर्धशतकाची नाेंद केली. त्याने घरच्या मैदानावर मनसाेक्त फलंदाजीचा अानंद लुटताना संघासाठी विजयश्री खेचून अाणली. त्याने ३२ चेंडूंमध्ये अापले पहिले अर्धशतक साजरे केले. त्याने संघाच्या विजयात नाबाद ५७ धावांचे याेगदान दिले. याशिवाय त्याने दिनेश कार्तिकसाेबत अभेद्य अर्धशतकी धावांची भागीदारी रचली.

  पुढील स्लाईडवर पहा, धावफलक ....

 • IPL, Shubhaman Gil's first half-century in IPL
 • IPL, Shubhaman Gil's first half-century in IPL

Trending