आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: विजयाने मुंबई संघाच्या अाशा कायम; पंजाबवर 6 गड्यांनी मात, गाठले पाचवे स्थान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्धशतकवीर सुर्यकुमार यादव सामनावीर ठरला. - Divya Marathi
अर्धशतकवीर सुर्यकुमार यादव सामनावीर ठरला.

इंदूर - झंझावाती फलंदाजीच्या बळावर कर्णधार राेहित शर्माने गत चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाच्या अायपीएलच्या बाद फेरीतील प्रवेशाच्या अाशा कायम ठेवल्या. राेहितने कृणालसाेबत शानदार खेळी करून मुंबईला शानदार विजय मिळवून दिला. यांच्या खेळीच्या बळावर मुंबई संघाने १९ षटकांत किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर ६ गड्यांनी मात केली. संघाच्या विजयात सामनावीर सूर्यकुमार यादवनेही (५७) माेलाचे याेगदान दिले.


यासह पराभवाची मालिका खंडित करताना मुंबईने लीगमध्ये तिसऱ्या विजयाची नाेंद केली.  अाता सहा गुणांच्या अाधारे मुंबई संघाने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर धडक मारली. चाैथ्या स्थानावर असलेल्या अश्विनच्या पंजाब संघाचा लीगमधील हा तिसरा पराभव ठरला.
क्रिस गेलच्या (५०) अर्धशतकाच्या अाधारे पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १७४ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने ४ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला सलामीवीर सूर्यकुमार यादवने  (५७) दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर राेहित शर्मा अाणि कृणाल पांड्याने तुफानी खेळी करताना अटीतटीच्या लढतीत संघासाठी विजयश्री खेचून अाणली.

 

सामनावीर यादव;राेहित-कृणालची अभेद्य भागीदारी  
अर्धशतकवीर सुर्यकुमार यादव सामनावीर ठरला. दरम्यान बाद फेरीतील प्रवेशाच्या अाशा पल्लवित करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या कर्णधार राेहितने शानदार खेळी केली. त्याने युवा फलंदाज कृणालसाेबत (नाबाद ३१) अभेद्य ५६ धावांची भागीदारी रचली. यात राेहितने नाबाद २४ धावांचे माेलाचे याेगदान दिले. 

 

पुढील स्लाईडवर पहा, धावफलक ......

बातम्या आणखी आहेत...