Home | Sports | From The Field | Kohli is lying! : James Anderson

कोहली खोटं बोलतोय! दाैऱ्यात अाता अँडरसनने टाकली वादाची ठिणगी

विनायक दळवी | Update - Jul 24, 2018, 09:16 AM IST

यापूर्वीच्या इंग्लंड दौऱ्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जिमी अँडरसन याने भारताच्या कप्तान विराट कोहलीला सतत बकरा केला होता

  • Kohli is lying! : James Anderson

    मुंबई- यापूर्वीच्या इंग्लंड दौऱ्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जिमी अँडरसन याने भारताच्या कप्तान विराट कोहलीला सतत बकरा केला होता. त्यामुळे २०१८च्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यात या दोघांमधील मैदानावर अाणि बाहेर युद्ध रंगणार यात वाद नाही. त्या युद्धाची पहिली ठिणगी जिमी अँडरसनने टाकली आहे. 'जोपर्यंत भारत जिंकत आहे तोपर्यंत मी धावा केल्या किंवा नाहीत यामुळे फरक पडत नाही,' असे विधान कोहलीने केले होते.


    त्यावर प्रतिक्रिया देताना अँडरसनने 'विराट खोटं बोलतोय!' असे विधान केले आहे. विराटला त्याच्या वैयक्तिक 'फॉर्म'ची काळजी वाटत नाही, असे म्हणणे म्हणजे दिशाभूल करण्यासारखे आहे. प्रत्येक फलंदाजाला आपल्या नावावर धावा लागणे महत्त्वाचे व गरजेचे वाटत असते. विराटही त्या गोष्टीला अपवाद नाही. गेल्या इंग्लंड दौऱ्यात सातत्याने अपयशी ठरल्यामुळे तर विराटला या वेळी धावा काढून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करणे क्रमप्राप्त ठरणार असल्याचे मतही अँडरसनने मांडले आहे. ते अपयश दूर करण्यासाठी विराट सध्या कसून सरावही करत असणार. त्यामुळे यंदाच्या मालिकेत विराट आणि माझ्यातील सामनाच रंगणार असे नाही, तर संघातील इतर गोलंदाजांबरोबरचे त्याचे युद्धही रोमहर्षक ठरणार असल्याची ग्वाहीही अँडरसनने दिली. मात्र, अँडरसनने सध्या इंग्लंडमधील उष्ण हवामान भारतीयांसाठी अधिक अनुकूल ठरणार असल्याचे भाकीत केले आहे. खेळपट्ट्या अधिक कोरड्या असतील.


    राजपुतचा सल्ला ठरला काेहलीला फायदेशीर
    २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात चार वेळा अँडरसनने विराटला बाद केले होते. त्यामुळे विराट भारतात परतताच प्रशिक्षक लालचंद राजपूत यांना भेटला होता. राजपूत यांनी तब्बल १५ दिवस विराटच्या फलंदाजीचे कच्चे दुवे हुडकून त्यावर उपाय सुचवले होते. त्याचाच विराटला पुढे लाभ झाला. राजपूत म्हणत होते, विराट अँडरसनचा प्रत्येक चेंडू इन स्विंगर असेल म्हणून खेळायचा. त्यानंतर मनातील इतर भितीही दुर झाली.

Trending