आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेंच्युरियन- दक्षिण अाफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी १३५ धावांनी विजय मिळवत भारताचे २५ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न भंग केले. कसोटीत पदार्पण करणाऱ्या लुंगी एनगिडीने (३९ धावांत ६ बळी) भेदक मारा करत २८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला १५१ धावांवर रोखले. भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेत केपटाऊन कसोटी गमावल्यानंतर २-० ने पिछाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली. भारतीय संघ १९९२ पासून दक्षिण अाफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही.
कालच्या ३ बाद ३५ धावांच्या पुढे खेळताना मधल्या फळीतील रोहित शर्माने सर्वाधिक ४७ धावा काढल्या. चेतेश्वर पुजारा ४७ चेंडूंत २ चौकार लगावत १९ धावांवर धावबाद झाला. यष्टिरक्षक पार्थिव पटेलने ४९ चेंडूंत २ चौकारांसह १९ धावा केल्या. रबाडाने मोर्कलकरवी त्याला झेलबाद केले. भारताच्या ६५ धावांवर ५ विकेट गेल्या. भारताने आपल्या ७ विकेट अवघ्या १०७ धावांवर गमावल्या. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह आल्यापावली तंबूत परतले. भारतीय मैदान गाजवणारे युवा खेळाडू विदेशीत अपयशी ठरले.
लुंगी एनगिडी ठरला सामनावीर
दक्षिण अाफ्रिकेकडून कसोटीत पदार्पण करणारा युवा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने अर्धा डझन फलंदाज बाद केले. सामनावीर ठरलेल्या एनगिडीने लाेकेश राहुल, कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्याला टिपले. त्याने १२.२ षटकांत ३९ धावा दिल्या. त्याचप्रमाणे कागिसो रबाडाने १४ षटकांत ४७ धावांत ३ फलंदाजांना तंबूत पाठवले.
दोन्ही डावांत पुजारा धावबाद
चेतेश्वर पुजारा (०,१९) सामन्याच्या दोन्ही डावांत धावबाद झाला. पुजारा दोन्ही डावांत धावबाद होणारा पहिला भारतीय फलंदाज व जगातील २३ वा खेळाडू ठरला आहे. डिसेंबर २००० नंतर आज अशा प्रकारे विकेट गेली.
दोन भागीदाऱ्या
दोन शतकी भागीदारी झाली मालिकेत आतापर्यत. डिव्हिलर्सचा दोन्हीत समावेश. पहिल्या कसोटीत त्याने डू प्लेसिससोबत ११४ धावांची आणि दुसऱ्या कसोटीत एल्गरसोबत १४१ धावांची शानदार भागीदारी रचली.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, धावफलक, माहिती व फोटोज....
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.