आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केपटाऊन कसोटी: दक्षिण आफ्रिका 130 धावांत गारद, शमी- बुमराहचे तीन-तीन बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केपटाऊन- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊनमधील पहिली कसोटी रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. आज चौथ्या दिवशी दक्षिण अफ्रिकेचा दुसरा डाव भारताने केवळ 130 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियासमोर 208 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

 

बुमराह-शमीच्या घातक गोलंदाजीमुळे आफ्रिका 130 धावांत गारद

 

- तिस-या दिवशीचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर आज चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले.
- 2 बाद 65 वरून खेळणारी आफ्रिका घरच्या मैदानावर अवघ्या 130 धावांत गारद झाली.
- महमद शमीने 28 धावात तीन तर बुमराहने 30 धावांत तीन गडी टिपले. 
- भुवनेश्वर कुमारने 33 धावांत 2 तर हार्दिक पांड्याने 27 धावांत 2 गडी टिपले.
- आफ्रिकेच्या दुस-या डावात आर. अश्विनने केवळ 1 षटक टाकले. यावरून केपटाऊनचे मैदान वेगवान गोलंदाजांना किती साथ देत आहे ते स्पष्ट होते.
- आफ्रिकेकडून कर्णधार एबी डिव्हिलर्सने (35), एडिन मार्कक्रमने (34) डीन एल्गारने (25) आणि केशव महाराजने (15) धावांचे योगदान दिले.
- आफ्रिकेचे उर्वरित फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत.

 

संक्षिप्त धावफलक-

 

दक्षिण आफ्रिका पहिला डाव सर्वबाद 286 आणि दुसरा डाव सर्वबाद 130

 

भारत- पहिला डाव सर्वबाद 209 आणि 3 बाद 61

बातम्या आणखी आहेत...