आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलानचे शतक; बेयरस्टोच्या अर्धशतकाने इंग्लंडला सावरले; मलान नाबादच्‍या 110 धावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ- स्पॉट फिक्सिंगच्या आरोपासह सुरू झालेल्या तिसऱ्या अॅशेस क्रिकेट कसोटीत डेव्हिड मलान आणि जॉनी बेयरस्टो यांच्या पाचव्या विकेटसाठी झालेल्या १७४ धावांच्या भागीदारीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या दिवशी ४ बाद ३०५ धावा केल्या. दिवसअखेर मलान नाबाद ११० आणि यष्टिरक्षक फलंदाज बेयरस्टो नाबाद ७५ धावांवर खेळत आहे. मलानच्या शतकाने चालू मालिकेत इंग्लंडने सर्वाधिक धावसंख्या व पहिले शतक झळकावले.  


सलामीवीर अॅलेस्टर कुक आपल्या १५० व्या कसोटीत ७ धावांवर बाद झाला. फलंदाज मार्क स्टोनमॅनने अर्धशतक झळकावले. त्याने ११० चेंडूंत १० चौकार खेचत ५६ धावा काढल्या. त्याने जेम्स विन्ससोबत दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावा केल्या. विन्सने २५ धावा जोडल्या. कुकला मिचेल स्टार्कने पायचीत केले. विन्सला हेजलवूडने तंबूत पाठवले. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक... 

बातम्या आणखी आहेत...