आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Mohammad Shami Wife Reveals About Her Husband Having Relation With Another Woman

शमीचे पाकिस्तानमधील वेश्येशी संबंध- पत्नीचा गंभीर आरोप; पाहा स्क्रिन शॉट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा पेस बॉलर मोहम्मद शमी याचे वैवाहिक जीवन संकटात आले आहे. लग्नानंतरही शमीच्या अनेक गर्लफ्रेंड असल्याच्या प्रकरणाने तो अडचणीत सापडला आहे. हे संगीन आरोप दुसरे तिसरे कोणी लावले नसून त्याची पत्नी हसीन जहाँ हिने सोशल मीडियाद्वारे केले आहेत. हसीन हिचे म्हणणे आहे की, तिचा पती शमीचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्स सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हसीन जहाँने आपल्या फेसबुक मॅसेंजर आणि व्हॉटस्अॅपद्वारे काही स्क्रीन शॉट्स शेयर केले आहेत. ज्याच्या आधारे तिने हा दावा केला आहे की, क्रिकेटर पती शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. ज्यात एका एका पाकिस्तानी वेश्येचाही समावेश आहे. शेयर केले फोटोज...

 

- संतप्त झालेल्या शमीच्या पत्नीने पाकिस्‍तानमधील कराची स्थित एक प्रॉस्‍टीट्यूटचा फोटो शेयर केला आहे. तसेच शमीचे तिच्यासोबतचे स्‍क्रीनशॉट सुद्धा पोस्‍ट केले आहेत. यातील एक फेसबुक चॅट सुमारे दीड वर्षापूर्वीचा (ऑक्टोबर 2016) आहे. अन्‍य एका फोटोत शमी एका महिलेसोबत दिसत आहे. ती सुद्धा शमीची ‘गर्लफ्रेंड’ असल्याचे पतीन जहांचे म्हणणे आहे.
 
- तिने आपल्या पोस्‍टमध्ये लिहले आहे की, 'ही **** आहे,, पाकिस्‍तानातील कराचीत राहते. ती एक वेश्‍या आहे आणि माझा पती मो. शमीचे चॅट पाहा. माझ्या फेसबुक मित्रांनो, लाज विकली यांनी.” याशिवाय नागपूरमधील एका मुलीबरोबरचा शमीचा फोटो शेयर केला आहे. सोबत तिच्यासोबतचे व्हॉट्सअॅप चॅट स्‍क्रीनशॉट्स पोस्‍ट केले आहेत. या सर्वाला जहांने कॅप्शन दिला आहे, पाहा माझ्या पतीचे एंजॉयमेंट.

 

संयम संपल्याने समोर आले- हसीन

 

- न्यूज चॅनेलशी बोलताना हसीनने आणखी सांगतिले की, नुकताच भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा झाला. यानंतर संपूर्ण संघ भारतात परतला मात्र शमी दुबईत थांबला.
- दुबईत थांबल्यानंतर हॉटेल बुक केले व पाकिस्तानातील एका वेश्येला बोलावून घेतले व तिच्यासोबत रूम शेयर केली.
- सर्व क्रिकेटर आपापल्या पत्नीला विदेश दौ-यावर घेऊन जातात मात्र, शमी मला घेऊन जात नाही. प्रत्येक वेळी काहीना काही कारण सांगून नेण्याचे टाळतो. गेली तीन वर्षे माझे आयुष्य त्याने बंदिस्त करून टाकले आहे.
- मी खूप सहन केले. मला त्याच्या घरात व तो नवरा म्हणून काहीही हक्क नाहीत. तो त्याच्या आयुष्यात काय करतो, काहीही सांगत नाही. पैशांचे काय करतो याची माहिती देत नाही. घरखर्चाचे पैसे तो घरातील मंडळींना देतो असे हसीनने सांगितले. 

 

कारमध्ये मिळाले कंडोम-

 

- हसीनने न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले की, "जेथे-जेथे मॅच होते, तेथे (शमी) मुलींना बोलावतो. नंतर तरूणींना अंघोळ करताना व्हिडिओ कॉलिंग करायला सांगतो."

- एक दिवस त्याच्या बीएमडब्ल्यू सीटखाली चार कंडोम मिळाले होते. तो जेव्हा कधी दुबईत जातो तेव्हा तो तरूणींना हॉटेलात बोलावून घेतो."

 

पत्नीसोबतचा बोल्ड फोटो शेयर केल्याने शमी कट्टरवाद्यांच्या आला होता निशाण्यावर-

 

- शमीने जून 2014 मध्ये कोलकात्याच्या राहणा-या हसीन जहाँसोबत लग्न केले. 
- या कपलला एक मुलगी आयरा आहे. शमीची पत्नी हसीन जहां एक मॉडेल राहिली आहे. 
- शमी पत्नी हसीनसोबतचे बोल्ड फोटो शेयर केल्याने कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आला होता.
- कट्टरवाद्यांनी अनेकदा तिच्या पत्नीच्या ड्रेसिंग सेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
- मोहम्मद शमी मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. मात्र, त्याची क्रिकेटची जडणघडण कोलकात्यात झाली.
- सौरव गांगुली व वसिम अक्रमने त्याच्यातील गुणवत्ता हेरली व त्याला बंगालच्या संघात स्थान दिले होते. शमी रणजीत बंगालकडून खेळतो.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शमीच्या पत्नीने शेयर केलेले स्क्रीनशॉट्स...

बातम्या आणखी आहेत...