Home | Sports | From The Field | MS Dhoni in 8th Indian Premier League final, Chennai Super Kings in 7th

IPL Final : धोनी आज विक्रमी आठव्यांदा फायनल खेळतोय, पाहा धोनीचा IPL प्रवास

दिव्यमराठी वेब टीम | Update - May 27, 2018, 01:22 PM IST

धोनीने चेन्नई संघाला आता सातव्यांदा फायनलमध्ये पोहचवले आहे.

 • MS Dhoni in 8th Indian Premier League final, Chennai Super Kings in 7th
  धोनीचे हे विक्रमी आठवे आयपीएल फायनल असेल. आठ आयपीएल फायनल खेळणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.

  मुंबई- इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार अशी ओळख असलेला चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी IPL मध्ये विक्रमी आठव्यांदा फायनल खेळण्यास रविवारी मैदानात उतरेल. धोनीच्या चेन्नई संघाने अव्वल स्थानी असलेल्या हैदराबादला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. धोनीचे हे विक्रमी आठवे आयपीएल फायनल असेल. आठ आयपीएल फायनल खेळणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.

  भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या 9 सत्रांत चेन्नई सुपरकिंग्जचे कर्णधार सांभाळले आहे. 2010 आणि 2011 मध्ये त्याने चेन्नईला चॅम्पियन बनवले होते. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने चार वेळा उपविजेतेपद पटकावले. धोनी 2016 मध्ये आयपीएलची नवी टीम पुण्याचा कर्णधार बनला होता. चेन्नईला दोन वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर धोनीला पुण्याचा कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, 2017 च्या सत्रात पुणे फ्रँचायझीने धोनीला कर्णधारपदावरून दूर करून ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथला नेतृत्व सोपवले. आता चेन्नई व राजस्थान संघाचे निलंबन संपल्यानंतर धोनीकडे चेन्नईचे पुन्हा कर्णधारपद सोपविण्यात आले. धोनीने चेन्नई संघाला आता सातव्यांदा फायनलमध्ये पोहचवले आहे. धोनी आता रविवारी चेन्नईला तिस-यांदा विजेतेपद मिळवून देणार का याची उत्सुकता आहे.

  आयपीएलमध्ये धोनीची कमाल-

  - 2010 : विजेता, चेन्नई सुपरकिंग्ज
  - 2011 : विजेता, चेन्नई सुपरकिंग्ज.
  - 2008, 2012, 2013, 2015 (4 वेळा) : उपविजेता चेन्नई सुपरकिंग्ज.
  - 2017 : उपविजेता, रायझिंग पुणे.
  - 2018 : फायनलमध्ये दाखल (चेन्नई सुपरकिंग्ज).

 • MS Dhoni in 8th Indian Premier League final, Chennai Super Kings in 7th
  चेन्नई संघाला निलंबित केल्यानंतर धोनी 2016 व 2017 च्या सत्रात पुणे संघाकडून खेळला. 2016 तो पुण्याचा कर्णधार होता तर 2017 मध्ये तो स्मिथच्या नेतृत्त्वाखाली खेळला.

Trending