आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Pujara, Ramesh Sharma, Murali, Parthivs Rest; The Test Casket From January 24th

पुजारा, राेहित शर्मा, मुरली, पार्थिवची विश्रांती निश्चित;24 जानेवारीपासून तिसरी कसाेटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाेहान्सबर्ग- सलगच्या दाेन पराभवांमुळे टीम इंडियावर दाैऱ्यात यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध कसाेटी मालिका गमावण्याची नामुष्की अाेढवली अाहे. अाता याच मालिकेतील अापला शेवट गाेड करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक अाहे. यासाठी पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या भारतीय संघात तिसऱ्या कसाेटीसाठी माेठा बदल हाेण्याचे संकेत अाहे. येत्या २४ जानेवारीपासून भारत अाणि दक्षिण अाफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसाेटीला जाेहान्सबर्ग येथे सुरुवात हाेईल. यासाठी संघातून युवा फलंदाज राेहित शर्मा, पार्थिव पटेल, चेतेश्वर पुजारा अाणि मुरली विजयला विश्रांती देण्यात येईल, अशी चर्चा अाहे.  त्यांच्या जागी संघात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता अाहे. यात अजिंक्य रहाणेसह दिनेश कार्तिकचा समावेश अाहे.   

 

सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाला मालिकेत सलग दाेन कसाेटींत पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे अाफ्रिकेला मालिकेत २-० ने विजयी अाघाडी मिळाली. यातील सुमार कामगिरीचा माेठा फटका टीम इंडियाला बसला. यजमान दक्षिण अाफ्रिकेच्या धारदार गाेलंदाजीसमाेर भारताच्या अाघाडीच्या फलंदाजांचा फार काळ निभाव लागत नाही. त्यामुळे टीम सलग दाेन वेळा अपयशी ठरली. काेहलीने दुसऱ्या कसाेटीत शतक ठाेकले. मात्र, ताे दुसऱ्या डावात अपयशी ठरला. यामुळे भारताचे विजयाचे लक्ष्य गाठण्याचे स्वप्न भंगले.   


गत सत्रात मालिका विजयाने भारताला अापला दबदबा निर्माण करता अाला. मात्र, अाता यंदाच्या नव्या सत्रातील पहिल्याच दाैऱ्यात भारतीय संघाला मालिका गमावावी लागली.

बातम्या आणखी आहेत...