Home | Sports | From The Field | RCB Vs KXIP Live Score Ipl 2018 Match Bengluru And Punjab In Bengluru On 13th April

RCB vs KXIP: डिव्हिलियर्सचे अर्धशतक, बंगळुरू विजयी ट्रॅकवर;पंजाबवर मात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2018, 07:50 AM IST

डिव्हिलियर्सच्या (५७) शानदार अर्धशतकाच्या बळावर यजमान राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ शुक्रवारी ११ व्या सत्राच्या इंडियन

 • RCB Vs KXIP Live Score Ipl 2018 Match Bengluru And Punjab In Bengluru On 13th April

  बंगळुरू- डिव्हिलियर्सच्या (५७) शानदार अर्धशतकाच्या बळावर यजमान राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ शुक्रवारी ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग (अायपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी ट्रॅकवर अाला. यजमान बंगळुरूच्या संघाने लीगमधील दुसऱ्या सामन्यात अापल्या घरच्या मैदानावर किंंग्ज इलेव्हन पंजाबला धूळ चारली. बंगळुरूच्या टीमने १९.३ षटकांत ४ गड्यांनी सामना जिंकला. बंगळुरूचा हा पहिला विजय ठरला. गत सामन्यात टीमचा पराभव झाला हाेता.


  सामनावीर उमेश यादव (३/२३), वाेक्स (२/३६), खेजराेलिया (२/३३) अाणि वाॅशिंग्टन सुंदर (२/२२) यांच्या धारदार गाेलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करताना पंजाबची १५५ धावांवर दाणादाण उडाली. प्रत्युत्तरात यजमान बंगळुरू संघाने ६ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. संघाच्या विजयात सलामीवीर डिकाॅकसह (४५), कर्णधार विराट काेहली (२१) अाणि मनदीप सिंगने (२२) माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे बंगळुरूच्या टीमला विजयाचा सूर गवसला. तसेच सलग दुसरा पराभवही टाळता अाला. दुसरीकडे पंजाबच्या टीमला लीगमध्ये पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. टीमचा विजयासाठीचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला.

  सामनावीर उमेश यादव

  बंगळुरू सामनावीर उमेश यादवने सामन्यात धारदार गाेलंदाजी करताना संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. त्याने ४ षटकांत अवघ्या २३ धावा देताना शानदार तीन विकेट घेतल्या. यासह ताे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

  पुढील स्‍लालडवर पाहा, फोटो आणि धावफलक...

 • RCB Vs KXIP Live Score Ipl 2018 Match Bengluru And Punjab In Bengluru On 13th April
 • RCB Vs KXIP Live Score Ipl 2018 Match Bengluru And Punjab In Bengluru On 13th April
 • RCB Vs KXIP Live Score Ipl 2018 Match Bengluru And Punjab In Bengluru On 13th April

Trending