Home | Sports | From The Field | Rishabh Pant, Kuldeep Yadav in the Indian team for one day series against england

ऋषभ पंत, कुलदीप यादव भारतीय संघात; भुवनेश्वरबाबत साशंकता

वृत्तसंस्था | Update - Jul 19, 2018, 07:43 AM IST

इंग्लंडविरुद्ध पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेसाठी पहिल्या तीन लढतींसाठी भारतीय कसोटी क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली.

 • Rishabh Pant, Kuldeep Yadav in the Indian team for one day series against england

  मुंबई - इंग्लंडविरुद्ध पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेसाठी पहिल्या तीन लढतींसाठी भारतीय कसोटी क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. टी-२० आणि वनडे मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या डावखुरा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. त्याबरोबर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचादेखील पहिल्या संघात समावेश करण्यात आला.

  १८ सदस्यीय संघात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे नाव नाही. भुवीच्या पाठीचे दुखणे तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान वाढले होते. पहिल्यापासून दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहचा संघात समावेश करण्यात आला आहे. तो दुसऱ्या सामन्यापासून खेळण्यासाठी उपलब्ध होऊ शकतो, अशी अशा आहे. कौटुंबिक वाद आणि फिटनेसमुळे बाहेर असलेल्या मोहंमद शमीने संघात पुनरागमन केले. त्याने नुकतीच यो-यो चाचणी पास केली आहे. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा, उमेश यादव आणि शार्दूल ठाकूर यांनीदेखील कसोटी संघात स्थान मिळवले. फिरकीपटूंमध्ये आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी आपले स्थान कायम राखले. कसोटीचा नियमित यष्टिरक्षक वृद्धिमान साहा तंदुरुस्त नाही. त्याच्या जागी दिनेश कार्तिकला संघात घेण्यात आले. भविष्याचा विचार करून ऋषभला संधी देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला.


  वनडेत अपयशी टीम इंडियाची कमजोरी; विराटने प्रथमच गमावली मालिका
  भारताने सलग ९ द्विपक्षीय वनडे मालिका जिंकल्यानंतर इंग्लंडविरुद्ध १-२ ने मालिका गमावली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा द्विपक्षीय मालिका गमावली. या पराभवामुळे भारताच्या कमजोरी समोर आल्या आहेत. त्या दूर न केल्यास विश्वचषकात भारतापुढे अडचणी वाढतील.

  १. सलामीवीरांवर निर्भर
  भारताच्या एखाद्या सलामीवीराने मोठी खेळी केल्यावर संघ आघाडी घेतो, असे न झाल्यास अडचणी निर्माण होतात. सरासरी कमी होते. तिसऱ्या वनडेत असेच झाले. तिसऱ्या वनडेत भारताने १० षटकांत १ बाद ३२ धावा काढल्या. इंग्लंडने आपल्या पहिल्या १० षटकांत २ बाद ७८ धावा केल्या. सुरुवातीला विकेट गेल्यानंतरही सरासरी वाढवावी लागेल.

  २. मध्यक्रम अपयशी
  विश्वचषक २०१५ नंतर वनडेत भारताच्या अव्वल तीन फलंदाजांनी ६० टक्के धावा काढल्या. मध्यक्रम सतत अपयशी ठरतोय. पहिल्या २ वनडेत राहुल चौथ्या क्रमांकावर आला. तिसऱ्यात बाहेर झाला. रैना लॉर्ड््सवर पाचव्या व लीड्सवर नंबर सहावर आला. धोनीचा क्रम बदलतो.

  ३. फिरकीविरुद्ध विराट कमजोर
  आयपीएल ११ मध्ये फिरकीसमोर विराट टिकू शकत नसल्याचे समोर आले. तो आठ वेळा फिरकीपटूंचा शिकार झाला. या मालिकेतील तिन्ही सामन्यांत त्याला फिरकीपटूंनी बाद केले. ही कमजोरी भारताला अडचणीची ठरत आहे. विराटला फलंदाजी सुधारावी लागले.
  यष्टिरक्षक दिनेश कार्तिक व गाेलंदाज मो. शमीचे पुनरागमन

  ४. यादवचे सातत्य नाही
  कुलदीपने वनडे मालिकेच्या सुरुवातीला पहिल्या सामन्यात ६, दुसऱ्या सामन्यात ३ विकेट घेतल्या आणि तिसऱ्या सामन्यात एकही विकेट घेतली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेत ज्यो रुटने कुलदीपच्या चेंडूवर वेळ घेत स्वीप व रिव्हर्स स्वीप खेळले. कुलदीपकडे सातत्य नाही. त्याला आणखी वेळ द्याला लागणार आहे.

Trending