आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राजदूत’ सचिनमुळे मुंबई लीगपासून अर्जुन दूर? सहा संघांच्या बांधणीसाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कर्तृत्ववान वडिलांच्या लोकप्रियतेचे ओझे घेऊन त्याच्या मुलांना जगावे लागते. आणि कारकिर्द एकाच पेशातील असेल तर अनेक मुलांच्या महत्त्वाकांक्षेचे बळीही पडतात. भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या मुलाच्या अर्जुन तेंडुलकरच्या बाबतीत तसे तर घडले नाही ना? त्याचं असं झालं, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या टी-२०  लिगला कित्येक दिवसांपासून मुहूर्त मिळत नव्हता; कुणीही लिग आयोजित करायला पुढे येत नव्हते. म्हणून यावेळी सहा संघांच्या लिगचा राजदूत म्हणून सचिन तेंडुलकरचे नाव जाहीर झाले आणि फ्रॅन्चायझी घेण्यासाठी उत्साह दिसून आला. येत्या शनिवारी (३ मार्च) सहा संघांच्या बांधणीसाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होईल. 


वादाच्या भीतीने झाला दूर

मुंबई लिगच्या आयोजन व्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या गणेश अय्यर म्हणाले, की त्याने या लीगमध्ये सहभागी होण्याचा फॉर्मही भरला नव्हता.


वादाच्या भितीने माघार

अर्जुन तेंडुलकर याचा समावेश ही गोष्ट या लीगच्या दृष्टीने नगण्य आहे. मात्र मुंबई क्रिकेट वर्तुळात सध्या ‘दुहेरी हितसंबंधामुळे’ अनेक जणांना संघटना किंवा क्रिकेट यापासून दूर केले जात आहे. असे असताना या लीगचा राजदूत असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा खेळणे योग्य आहे का? कदाचित हा प्रश्न उपस्थित केला गेला असता म्हणूनच वाद टाळण्यासाठी, अर्जुनला या लिगपासून दूर ठेवणेच सोयीस्कर ठरले; अशीही चर्चा आहे. या वर्षाच्या प्रारंभापासून अर्जुन तेंडुलकरचा गोलंदाजीची अॅक्शन सुधारण्याचा सराव सुरू आहे. युवा खेळाडू अर्जुनचे वय १८ आहे. ही लिग त्याच्यासाठी योग्य व्यासपीठ ठरू शकली असती. 

 

अर्जुनचे एमसीएला पत्र
खेळाडूंना निश्चित स्थान मिळणार आहे. उर्वरित ३०० खेळाडूंमधून योग्यतेनुसार खेळाडूंची निवड होणार आहे. त्यामुळे सहा संघामध्ये अर्जुन तेंडुलकरचे स्थान निश्चित होते. मात्र संघांमध्ये मुंबईच्या खेळाडूंची विभागणी होण्याआधीच, अर्जुनने मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्र पाठवून आपण गोलंदाजीच्या अॅक्शन मधील बदलाचा सराव करीत असल्यामुळे या लीगमध्ये सहभागी होता येणार नाही, असे कळविले.

बातम्या आणखी आहेत...