आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी कसाेटी/ चाैथा दिवस; शमीच्या चार विकेट, आफ्रिकेची अाघाडी, भारतासमाेर माेठे लक्ष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंच्युरियन- टीम इंडियाच्या माे. शमीने (४/४९) शानदार गाेलंदाजीच्या बळावर यजमान दक्षिण अाफ्रिकेला दुसऱ्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात झटपट राेखले. त्यामुळे  अाफ्रिकेला दुसऱ्या डावात २५८ धावा काढता अाल्या. यातून यजमानांना एकूण २८६ धावांची अाघाडी मिळाली. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३ अाणि ईशांत शर्माने २ गडी बाद केले. विजयाच्या २८७ धावांच्या प्रत्युत्तरात भारताची दुसऱ्या डावात निराशाजनक सुरुवात झाली. भारताने चाैथ्या दिवसअखेर ३ बाद ३५ धावा काढल्या. अाता २५२ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताकडे ७ विकेट शिल्लक अाहेत. पाचव्या दिवशी हे लक्ष्य गाठून मालिकेत बराेबरी साधण्याचा भारताचा प्रयत्न असेल. संघाला  पुजारा (११) व पार्थिवकडून (५)  माेठ्या खेळीची अाशा अाहे.


यजमान दक्षिण अाफ्रिकेने २ बाद ९० धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. दरम्यान सलामीच्या एल्गरने संयमी खेळी करताना मैदानावर जम बसवला. त्याने शानदार अर्धशतक साजरे केेले. त्याने १२१ चेंडूंचा सामना करताना ८ चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे ६१ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने अापला सहकारी डिव्हिलियर्सलाही माेलाची साथ दिली. या दाेघांनी शानदार खेळी करताना टीमच्या धावसंख्येला गती दिली. यादरम्यान डिव्हिलियर्सने १२१ चेंडूंत ८० धावा काढल्या. यात १० चाैकारांचा समावेश अाहे. 


त्यानंतर कर्णधार डुप्लेसिसने संघाच्या धावसंख्येला गती दिली. त्याने ४८ धावांची महत्त्वपूर्ण केली. अर्धशतकापासून दाेन पावलांवर असताना त्याला युवा गाेलंदाज बुमराहने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 

 

शमीचा चाैकार 
 शमीने शानदार कामगिरी करताना चाैथा दिवस गाजवला. त्याने १६ षटकांत ४९ धावा देताना चार गडी बाद केले. त्यापाठाेपाठ जसप्रीत बुमराहही चमकला. त्याने ३ गडी बाद करून अाफ्रिकेला झटपट राेखण्यात याेगदान दिले. तसेच ईशांत शर्माने २ विकेट घेतल्या. अार.अश्विनने एक गडी बाद केला.

 

विराट काेहलीवर दंडात्मक कारवाई
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीचा अाक्रमक स्वभाव हा सर्वांच्या परिचयाचा अाहे. अाता याच स्वभावामुळे त्याला माेठा फटका बसला. त्याच्यावर दुसऱ्या कसाेटीदरम्यान पंचांसाेबतचा वाद अाणि रागाच्या भरात जाेरात चेंडू फेकणे चांगलेच महागात पडले. याच गैरवर्तनामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात अाली. त्याला सामना निधीच्या २५ टक्के रकमेचा दंड ठाेठावण्यात अाला. त्याला करिअरमध्ये प्रथमच निगेटिव्ह पॉइंट मिळाला. काेहलीने २५ व्या षटकादरम्यान पंचांकडे चेंडू भिजल्याची तक्रार केली हाेती.

 

सात वर्षांनंतर दिनेश कार्तिक कसाेटी संघात
यष्टिरक्षक दिनेश कार्तिकला तब्बल सात वर्षांनंतर भारतीय कसाेटी टीममध्ये स्थान मिळाले. त्याची दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध हाेणाऱ्या अागामी तिसऱ्या कसाेटीसाठी संघात निवड झाली. येत्या २४ जानेवारीपासून जाेहान्सबर्ग येथे तिसऱ्या कसाेटीला सुरुवात हाेईल. कार्तिक हा या कसाेटीत जखमी वृद्धिमान साहाच्या जागी खेळणार अाहे. त्याने अापला शेवटचा कसाेटी सामना २०१० मध्ये बांगलादेशविरुद्ध चितगाव येथे खेळला हाेता.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक...

बातम्या आणखी आहेत...