आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sehwag, Kaif And Laxman Twitted About Team India Position In Second Test At Centurion

दुस-या कसोटीत भारत पराभवाच्या छायेत; सेहवाग, कैफ, लक्ष्मणने केल्या या कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकेविरोधातील दुस-या कसोटीत भारत पराभवाच्या छायेत आहे. सेंन्चुरियनमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात भारताला 287 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. मात्र, त्याचा पाठलाग करताना भारताने 35 धावात महत्त्वाच्या 3 अहम विकेट गमावल्या आहेत. पण चेतेश्वर पुजारा, पार्थिव पटेल, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि आर. अश्विन अजून बाद झाले नाहीत. भारताची दारूण अवस्था झाल्यानंतर दिग्गजांच्या म्हणण्यानुसार, ही मॅच भारताच्या हातातून निसटली आहे. सेहवागने शेयर केला 'लगान'चा सीन...

 

- माजी स्फोटक बॅट्समन वीरेंद्र सेहवागने मॅचमध्ये टीम इंडियाची स्थिती पाहून फिल्म 'लगान' मधील एक फोटो शेयर केला आहे. ज्यात आमिर खान आकाशाकडे पाहताना दिसत आहे.
- या फोटोसोबत सेहवागने लिहले की, 'भारतीय टीम आज सेंन्चुरियनमध्ये काहीशी अशीच (पाऊस) अपेक्षा करत असेल.'
- दुसरीकडे, टीम इंडियाचा माजी खेळाडू मो. कैफ याच्या म्हणण्यानुसार, ही कसोटी भारताच्या हातातून निसटली आहे. 
- मॅचमध्ये विराटची विकेट पडताच कैफने ट्विट करत लिहले की, ऑल इज ओव्हर.... भारताच्या हातून मॅच गेली.
- मात्र, क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मणच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघ अजूनही सामना जिंकू शकते.
- लक्ष्मणने ट्वीट करत लिहले की, 'कसोटी क्रिकेटमध्ये आपला खरा खेळ करण्याची व मॅचमध्ये पुनरागमनाची संधी आहे. भारतासाठी ही आव्हानात्मक टास्क आहे. 
- पण विश्वास आहे की, भारतीय खेळाडू लढतील आणि आत्मविश्वासाने या स्थितीतून बाहेर निघतील. डोक्यात छोटे-छोटे टारगेट ठेवा आणि ते मिळविण्याचा प्रयत्न करा.' 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, काय काय आल्या आहेत कमेंट्स....