आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Shardul Thakur Has Established Himself As The Spearhead Of Mumbai Team Bowling Attack

करिअरवरून चिंताग्रस्त राहायचा हा क्रिकेटर, सचिनच्या सल्ल्याने बदलले लाईफ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- श्रीलंकेत 6 मार्चपासून टी 20 ट्रायनेशन सीरीज खेळणार आहे. या सीरीजसाठी घोषित टीम इंडिया संघात शार्दुल ठाकुर याला स्थान मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या साउथ अफ्रिकेतील टी 20 सीरीजमध्ये टीमचा भाग होता. शार्दुल मीडियम पेसर बॉलर आहे, महाराष्ट्रातील पालघरमधील राहणारा आहे. तसेच नॅशनल टीममध्ये डेब्यू करम्याआधी इंडिया-ए आणि मुंबई टीमकडून खेळला आहे. सचिनच्या सल्ल्याने बदलले लाईफ...

 

- शार्दुल क्रिकेटमध्ये एक फास्ट बॉलर म्हणून आपले करिअर बनवण्याचा प्रयत्न करत होता. 2012 मध्ये त्याचे वजन वाढून तब्बल 83 किलो झाले होते. 
- डेब्यू सीजनमध्ये त्याच्या बॉलिंगपेक्षा वजनाची चर्चा जास्त होती. त्यावेळी शार्दुलला अनेकांनी वजन कमी करण्याचा सल्ला दिला. पण, कुणाच्याही सल्ल्याचा त्यावर परिणाम झाला नाही. 
- याच दरम्यान त्याची भेट मास्टर ब्लास्टर सचिनशी झाली. त्याचवेळी, तुला क्रिकेटमध्ये करिअर घडवायचे असेल तर सर्वप्रथम फिटनेसवर लक्ष केंद्रित करावे लागेल. 
- सचिनने समजावून सांगितल्यानंतरच शार्दुलला फिटनेसचे महत्व कळाले. यानंतरच त्याने आपले वजन चक्क 13 किलोंनी कमी केले.

 

जेव्हा सचिनच्या नंबरची जर्सी घालणे पडले महाग-

 

- शार्दुल ठाकूरने गेल्या वर्षी 31 ऑगस्ट रोजी भारत आणि श्रीलंका विरुद्ध कोलंबो येथे झालेल्या चौथ्या वनडेमध्ये डेब्यु केले. डेब्यू मॅचमध्ये त्याने 10 नंबरची जर्सी घातली होती. 
- शार्दुलच्या जर्सीचा क्रमांक पाहूण भारतीय क्रिकेट चाहते प्रचंड नाराज झाले. सोशल मीडियावर फॅन्सने आपला संताप व्यक्त केला होता. 
- सचिन आपल्या कारकिर्दीत 10 नंबरची टी-शर्ट घालत होता. तो फॅन्ससाठी भावनिक होता. 
- अनेकांनी त्याला ट्रोल करून पुन्हा या नंबरची जर्सी घालू नको असे सांगितले होते.

 

यामुळे घालतो 10 नंबर...

 

- डेब्यू मॅचनंतर त्याला 10 नंबरची जर्सी का घातली असा सवाल करण्यात आला होता. त्यावर शार्दुल म्हणाला, 'माझ्या जन्मदिवसाच्या तारखांची बेरीज 10 आहे. त्यामुळे मी 10 नंबर घेतला होता.'
- शार्दुलचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 (16101991) रोजी झाला. यात सर्व आकड्यांची बेरीज केल्यास 28 असा आकडा येतो. 2 आणि 8 यांची बेरीज केल्यास 10 नंबर निघतो. 
- विशेष म्हणजे, त्याने आपल्या करिअरची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट 10 व्या बॉलवरच घेतली होती.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज व माहिती....

बातम्या आणखी आहेत...