आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Social Media Reactions After 1st Match Of Nidahas T20 Tri Series At Colombo

पहिल्या T-20 मध्ये टीम इंडियाची हार, यूजर्स म्हणाले, रोहितने मागितला ठाकूरचा हात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- यजमान श्रीलंकाने निदाहास ट्रॉफी टी-20 ट्राय सीरीजमध्ये पहिल्या मॅचमध्ये भारताला 5 विकेटने हरवत मालिकेची सुरूवात विजयाने केली. मॅचमध्ये श्रीलंकन टीमने प्रथम भारताला 174/5 धावात रोखले व नंतर 18.3 षटकात 5 विकेट गमावून विजयी लक्ष्य गाठले. कोलंबोत झालेल्या या मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव होताच सोशल मीडियात फॅन्सचा राग अनावर झाला. फॅन्सनी मॅचमध्ये सर्वाधिक धावा देणा-या बॉलर्स शार्दुल ठाकुर आणि जयदेव उनाडकटला लक्ष्य केले. यात शार्दुलने 3.3 षटकात 12 च्या सरासरीने 42 धावा दिल्या तर, उनाडकटने 3 षटकात 11.66 च्या सरासरीने 35 धावा दिल्या. शार्दुलने तर आपल्या एका षटकात 27 धावा दिल्या.

 

मॅच समरी

 

भारत- 174/5 रन (20 ओवर, शिखर धवन- 90, मनीष पांडे- 37)
श्रीलंका- 175/5 (18.3 ओवर, कुशल परेरा- 66, तिषारा परेरा- 22*)

 

- भारताकडून शिखर धवनने मॅचमध्ये आपल्या टी 20 करियरमधील बेस्ट स्कोर बनविला. त्याने 49 बॉलमध्ये 90 धावा काढल्या. ज्यात 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.

- धवनने मनीष पांडेसोबत तिस-या विकेटसाठी 95 धावांची तर ऋषभ पंतसोबत 49 धावाची भागीदारी केली. 

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मॅचमध्ये भारत पराभूत होताच यूजर्सनी कसा काढला राग....

बातम्या आणखी आहेत...