Home | Sports | From The Field | South Africa beat Sri Lanka by five wickets

ड्युमिनीच्या अर्धशतकाने अाफ्रिकेचा विजय; दक्षिण अाफ्रिकेची रविवारी यजमान श्रीलंकेवर ५ गड्यांनी मात

वृत्तसंस्था | Update - Jul 30, 2018, 08:14 AM IST

कसाेटी मालिकेतील पराभवातून सावरलेला दक्षिण अाफ्रिका संघ रविवारी विजयी ट्रॅकवर परतला.

  • South Africa beat Sri Lanka by five wickets

    दाम्बुला- कसाेटी मालिकेतील पराभवातून सावरलेला दक्षिण अाफ्रिका संघ रविवारी विजयी ट्रॅकवर परतला. जेपी ड्युमिनीच्या (५३) नाबाद तुफानी अर्धशतकाच्या बळावर अाफ्रिकेने वनडे मालिकेत विजयी सलामी दिली. अाफ्रिकेने सलामीच्या वनडे सामन्यात यजमान श्रीलंका संघावर ५ गड्यांनी मात केली. यासह अाफ्रिकेने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसरा वनडे सामना १ अाॅगस्ट, बुधवारी रंगणार अाहेे. या टीमला नुकत्याच झालेल्या कसाेटी मालिकेत सलग दाेन वेळा पराभवाचा सामना करावा लागला.


    रबाडा, शाम्सीने उडवला खुर्दा : अाफ्रिकेच्या कागिसाे रबाडा (४/४१) अाणि शाम्सी (४/३३) यांनी धारदार गाेलंदाजी करताना यजमान श्रीलंकेचा खुर्दा उडवला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने अवघ्या ३४.३ षटकांत १९३ धावांत अापला गाशा गुंडाळला. संघाकडून कुशल परेराने ८१ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात अाफ्रिका संघाने ३१ षटकांत ५ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. यासह अाफ्रिकेला विजयाची नाेंद करता अाली. संघाच्या विजयात डिकाॅक (४७) अाणि डुप्लेसिसनेही (४७) माेलाचे याेगदान दिले. त्यांनी झंझावाती खेळी करताना तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची महत्वाची भागीदारी रचली. त्यामुळे टीमच्या विजयाचा मार्ग सुकर केला. दरम्यान, ड्युमिनीने संघाचा विजय निश्चित केला.


    ड्युमिनीचे अर्धशतक
    अाफ्रिकेच्या विजयासाठी ड्युमिनीने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने ३२ चेंडूंचा सामना करताना ६ चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे ५३ धावा काढल्या. या नाबाद खेळीतून त्याने अापल्या टीमचा विजय साकारला. यादरम्यान त्याला डेव्हिड मिलर (१०) अाणि मुल्डेरची (नाबाद १४) माेलाची साथ मिळाली. त्यामुळे त्याला सामन्यात विजयश्री खेचून अाणण्यात यश मिळलाे. त्यांनीही महत्त्वपुर्ण खेळी केली.

Trending