Home | Sports | From The Field | Sri Lanka won second test by 99 runs

श्रीलंकेची तपश्चर्या फळाला; अाफ्रिकेवर मालिका विजय, हेराथचे ६ बळी

वृत्तसंस्था | Update - Jul 24, 2018, 09:13 AM IST

प्रचंड मेहनतीमधून अाता यजमान श्रीलंका संघाची तपश्चर्या फळाला अाली.

 • Sri Lanka won second test by 99 runs

  काेलंबाे- प्रचंड मेहनतीमधून अाता यजमान श्रीलंका संघाची तपश्चर्या फळाला अाली. श्रीलंका संघाने तब्बल १२ वर्षांनंतर घरच्या मैदानावर बलाढ्य दक्षिण अाफ्रिकेला क्लीन स्वीप दिले. यजमान श्रीलंकेने दुसऱ्या कसाेटीत १९९ धावांनी विजय संपादन केला. यासह श्रीलंका संघाने साेमवारी अाफ्रिकेविरुद्धची दाेन कसाेटी सामन्यांची मालिका २-० ने अापल्या नावे केली. सपशेल अपयशी ठरलेल्या अाफ्रिकेचा या मालिकेत धुव्वा उडाला. दिमुथ करुणारत्ने हा सामनावीर अाणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याची मालिकेतील कामगिरी लक्षवेधी ठरली.


  विजयाच्या खडतर ४९० धावांच्या प्रत्युत्तरात अाफ्रिकेचा दुसऱ्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात २९० धावांवर खुर्दा उडाला. श्रीलंका संघाने पहिल्या डावात ३३८ धावा काढल्या. त्यानंतर अापला दुसरा डाव २७५ धावांवर घाेषित केला हाेता. दरम्यान, अाफ्रिकेला दुसऱ्या डावातही समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. सुमार खेळीमुळे अाफ्रिकेला अापला सलग दुसरा पराभव टाळता अाला नाही. त्यामुळे या संघावर मालिका पराभवाची नामुष्की अाेढवली.


  रिचर्ड हेडलीच्या बराेबरीची संधी एका विकेटने हुकली
  हेराथने अापल्या कसाेटी करिअरमध्ये ४३० विकेट घेतल्या. अाता हा ४० वर्षीय गाेलंदाज सर्वाधिक विकेटच्या यादीत नवव्या स्थानावर अाला. त्याने ९२ कसाेटीत हे यश संपादन केले अाहे. त्याचा रिचर्ड हेडलीशी (४३१) बराेबरी साधण्याचा प्रयत्न अपुरा ठरला.


  हेराथचा षटकार
  यजमान श्रीलंका संघाच्या हेराथने दुसऱ्या डावात धारदार गाेलंदाजी केली. यासह त्याने विकेटचा षटकार मारला. त्याने दुसऱ्या डावात सहा विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने ९८ धावा दिल्या. यातूनच त्याने अाफ्रिका संघाची दाणादाण उडवली. तसेच परेरा अाणि धनंजयाने प्रत्येकी दाेन गडी बाद केले.


  हा ठरला श्रीलंकेचा तिसरा मालिका विजय
  श्रीलंका संघाने सप्टेंबर २०१७ नंतर अाजतागायत घरच्या मैदानावर तिसऱ्या कसाेटी मालिका विजयाची नाेंद अापल्या नावे केली. या दाेन वर्षांदरम्यान श्रीलंकेने एकूण पाच मालिका खेळल्या. यातील केवळ दाेन मालिकांमध्ये श्रीलंका संघ विजयी ठरला. यात पाकविरुद्ध (२-०) अाणि बांगलादेशविरुद्धच्या (१-०) मालिका विजयाचा समावेश अाहे. यादरम्यान श्रीलंकेला भारताविरुद्धच्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला.


  थियुनिसचे शतक व्यर्थ
  सलगच्या पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी अाफ्रिकेच्या सलामीवर थियुनिस ब्रुनने एकाकी झुंज दिली. त्याने दुसऱ्या डावात १०१ धावांची खेळी केली. मात्र, त्याला अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. तसेच सलामीच्या बावुमाने ६३ धावांचे याेगदान दिले. हे दाेघे वगळता अाफ्रिकेचे इतर फलंदाज स्वस्तात बाद झाले.


  अाफ्रिकेचा २९० धावांत खुर्दा
  खडतर लक्ष्यचा पाठलाग करताना अाफ्रिका संघाने साेमवारी ५ बाद १३९ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. ब्रुन अाणि बावुमाने संयमी खेळी करताना संघाच्या धावसंख्येला गती दिली. यादरम्यान दाेघांनी १२३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मात्र, त्यांना अापली ही लय कायम ठेवता अाली नाही. हेराथने या दाेघांनाही बाद करून संघाच्या विजयातील माेठे अडसर दूर केले. यासह त्याने संघाच्या विजयाचा मार्गही सुकर केला.

Trending