Home | Sports | From The Field | Sunrisers Hyderabad Vs Kolkata Knight Riders Live Match Streaming

IPL 2018 KKR vs SRH: सनरायझर्स हैदराबाद संघाची विजयी हॅट्ट्रिक; केेकेअार पराभूत

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 15, 2018, 12:37 AM IST

विलियम्सनच्या (५०) नेतृत्वाखाली जबरदस्त फाॅर्मात असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने शनिवारी ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्

 • Sunrisers Hyderabad Vs Kolkata Knight Riders Live Match Streaming

  काेलकाता- विलियम्सनच्या (५०) नेतृत्वाखाली जबरदस्त फाॅर्मात असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने शनिवारी ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये विजयाची हॅट््ट्रिक नाेंदवली. हैदराबाद संघाने अापल्या तिसऱ्या सामन्यात दाेन वेळच्या किताब विजेत्या काेलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला. हैदराबादने ५ गड्यांनी सामना जिंकला. सलगच्या तीन विजयांच्या बळावर हैदराबाद संघाने अाता गुणतालिकेतील अापले अव्वल स्थान अधिक मजबूत केले. दुसरीकडे काेलकात्याच्या टीमला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.


  काेलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ बाद १३८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाने ५ गड्यांच्या माेबदल्यात सामना जिंकला.


  विलियम्सनचे अर्धशतक

  हैदराबाद संघाच्या विजयासाठी कर्णधार विलियम्सनने (५०) झंझावाती खेळी केली. त्याला शाकीबची माेलाची साथ मिळाली. त्यांनी चाैथ्या गड्यासाठी ५९ धावांची भागीदारी रचली. यात


  शुभमनची निराशा

  विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमनचा अायपीएलमध्ये दमदार पदार्पणाचा प्रयत्न अपयशी ठरला. त्याला अापल्या पहिल्याच सामन्यात अवघ्या ३ धावांचे याेगदान देता अाले. त्याला यंदाच्या सत्रात काेलकाता टीमचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.


  भुवनेश्वरची धारदार गाेलंदाजी

  हैदराबाद संघाकडून युवा गाेलंदाज भुवनेश्वर कुमार चमकला. त्याने धारदार गाेलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. याशिवाय शाकीब अल हसन अाणि बिली स्टानलेकने प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या. त्यामुळे काेलकाता टीमला घरच्या मैदानावर समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. त्यामुळे काेलकात्याला पराभवाचा सामना करावा लागला.

  अाजचे सामने
  - राजस्थान राॅयल्स वि. राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू, वेळ : दु. ४.०० वाजेपासून, मैदान : बंगळुरू
  - किंग्ज इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपरकिंग्ज, वेळ : रात्री ८.०० वाजेपासून, मैदान : इंदूर

 • Sunrisers Hyderabad Vs Kolkata Knight Riders Live Match Streaming
 • Sunrisers Hyderabad Vs Kolkata Knight Riders Live Match Streaming

Trending