Home | Sports | From The Field | Sunrisers Hyderabad Vs Mumbai Indians Live Match Streaming

अायपीएल-11; हैदराबाद टीमचा दुसरा विजय; मुंबई इंडियन्सचा सलग पराभव, 1 गड्याने मात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 13, 2018, 02:17 AM IST

विलियम्सनच्या नेतृत्वाखाली यजमान सनरायझर्स हैदराबाद संघाने यंदाच्या ११ व्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीगमध्ये (अायपीएल)

 • Sunrisers Hyderabad Vs Mumbai Indians Live Match Streaming

  हैदराबाद- विलियम्सनच्या नेतृत्वाखाली यजमान सनरायझर्स हैदराबाद संघाने यंदाच्या ११ व्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीगमध्ये (अायपीएल) गुरुवारी सलग दुसरा विजय संपादन केला. हैदराबादने घरच्या मैदानावर गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सवर १ गड्यांनी मात केली. यासह मुंबईच्या टीमला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. अाता मुंबईचा सामना शनिवारी दिल्ली टीमशी हाेईल.

  प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने निर्धारित २० षटकांत ८ बाद १४७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात यजमान हैदराबाद संघाने ९ गड्यांच्या माेबदल्यात सामना जिंकला. संघाच्या विजयात शिखर धवन (४५), साहा (२२), दीपक हुडा (नाबाद ३२) यांनी माेलाचे याेगदान दिले. मुंबईकडून मयंक मारकंडेने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मात्र, त्याला हैदराबादला राेखता अाले नाही. त्यामुळे मुंबईचा अापला सलग दुसरा पराभव टाळण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.

  रशिद खान सामनावीर
  सनरायझर्स हैदराबाद संघाचा युवा गाेलंदाज रशिद खानला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात अाले. त्याने सामन्यात शानदार गाेलंदाजी करताना ४ षटकांत अवघ्या १३ धावा देताना एक विकेट घेतली. त्याची सामन्यातील ही कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्यापाठाेपाठ टीमकडून संदीप शर्मा, स्टॅनलाके अाणि सिद्धार्थ काैलने प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा माेठ्या खेळीचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला.

  पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो आणि धावफलक...

Trending