आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका; मँचेस्टरच्या मैदानावर सलामी सामना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर- जबरदस्त फाॅर्मात असलेला कर्णधार विराट काेहली अाता अापल्या नव्या युवा ब्रिगेडच्या मदतीने मालिका विजयाचे मिशन फत्ते करण्यासाठी सज्ज झाला अाहे. मंगळवारपासून भारत अाणि यजमान इंग्लंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत अाहे. मँचेस्टरच्या मैदानावर मालिकेतील सलामी सामना रंगणार अाहे. यात बाजी मारून अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याचा भारतीय संघाचा कर्णधार काेहलीचा मानस अाहे. यासाठी मागील दाेन दिवस टीम इंडियाने कसून सराव केला. त्यामुळे निश्चितपणे याचा फायदा टीम इंडियाला विजयी सलामीसाठी हाेईल. 


नुकत्याच अायर्लंडविरुद्ध मालिका विजयाने टीम इंडियाचा अात्मविश्वास द्विगुणित झालेला अाहे. अाता याच अात्मविश्वासाने यजमान इंग्लंडविरुद्ध कसाेशीने झुंज देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. यजमान इंग्लंडचा अापल्या घरच्या मैदानावर मालिका विजयासाठी दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल. यातूनच हा सामना राेमांचक हाेईल. 


इंग्लंडमध्ये यजमानांना राेखण्याची संधी
भारताला इंग्लंडमध्ये यजमानांना राेखण्याची संधी अाहे. अातापर्यंत भारताला यजमान इंग्लंडला घरच्या मैदानावर धूळ चारता अाली नाही. अाेव्हर अाॅलमध्ये झालेल्या ११ पैकी ५ सामन्यांत भारताने इंग्लंडचा पराभव केला. 


वेळापत्रक 
३ जुलै पहिला टी-२० रात्री १०.०० वा. 
६ जुलै दुसरा टी-२० रात्री १०.०० वा. 
८ जुलै तिसरा टी-२० सायं. ६.३० वा. 

बातम्या आणखी आहेत...