आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

T20 Series: भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना अाज रंगणार; सलग मालिका विजयाचा टीम इंडियाचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- अात्मविश्वास द्विगुणित झालेला भारतीय संघ अाता इंग्लंड दाैऱ्यात अाठवडाभरात सलग दुसऱ्या मालिका विजयासाठी सज्ज झाला अाहे. सलामीच्या वनडेतील विजयाने टीम इंडिया जबरदस्त फाॅर्मात अाहे. त्यामुळे अाता शनिवारी इंग्लंडविरुद्ध दुसरा वनडे सामनाही जिंकण्याचा भारतीय संघाचा मानस अाहे. यातील विजयाने टीम इंडियाला तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी अाघाडी घेता येईल. तसेच टी-२० पाठाेपाठ अाता वनडे मालिकाही अापल्या नावे करता येईल. नुकतीच भारतीय संघाने यजमानांविरुद्धची तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने खिशात घातली. हा पराक्रम भारताने गत रविवारी गाजवला. 


राेहित, कुलदीपवर सर्वांची नजर
कुलदीप यादव अाणि राेहित शर्माचे  सलामीच्या विजयात माेलाचे याेगदान राहिले अाहे. त्यामुळेत अाता पुन्हा एकदा दर्जेदार कामगिरी करताना टीम इंडियाचा मालिका विजय निश्चित करण्याचा या दाेघांचा प्रयत्न असेल. राेहितने  नाबाद १३७ धावांची खेळी केली. कुलदीपने ६ विकेट घेतल्या.   


संभाव्य संघ...
भारत :
काेहली (कर्णधार), शिखर धवन, राेहित शर्मा, लाेकेश राहुल, धाेनी, कार्तिक,  रैना, हार्दिक , कुलदीप, यजुवेंद्र चहल, श्रेयस, सिद्धार्थ काैल, अक्षर, उमेश, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर.  

इंग्लंड : माेर्गन (कर्णधार), जेसन राॅय, जाॅनी बैयरस्ट्राे, जाेस बटलर, माेईन अली, ज्याे रुट, बाॅल, डेव्हिड मालान, लिम प्लंकेट, बेन स्टाेक्स, अादिल रशीद, डेव्हिड व्हिल्ली, मार्क वुड.

बातम्या आणखी आहेत...