Home | Sports | From The Field | T20 series win in Dublin; India crush Ireland in record victory

राहुल, रैनाच्या अर्धशतकाने भारतीय संघाचा अायर्लंडवर मालिका विजय; टी-२० मालिका २-० ने जिंकली

वृत्तसंस्था | Update - Jun 30, 2018, 08:21 AM IST

विराट काेहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने शुक्रवारी अायर्लंडविरुद्धची टी-२० मालिका अापल्या नावे केली.

 • T20 series win in Dublin; India crush Ireland in record victory

  डब्लिन- विराट काेहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने शुक्रवारी अायर्लंडविरुद्धची टी-२० मालिका अापल्या नावे केली. भारताने मालिकेतील दुसऱ्या अाणि शेवटच्या सामन्यात अायर्लंडचा धुव्वा उडवला. भारताने १४३ धावांनी सामना जिंकला. या सलग दुसऱ्या विजयाने भारताला ही मालिका अापल्या नावे करता अाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात अायर्लंड संघाला अवघ्या १२. ३ षटकांत ७० धावाच काढता आल्या. या टीमचा मालिकेतील हा सलग दुसरा माेठा पराभव ठरला. यजुवेंद्र चहल, कुलदीप यादवने प्रत्येकी ३ तर उमेश यादवने २ विकेट घेत अायर्लंडचा धुव्वा उडवला.


  भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका विजयाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी उत्सुक अाहे. ३ जुलैपासून या मालिकेला सुरुवात हाेईल. या मालिकेच्या तयारीसाठीच अायर्लंडविरुद्धची ही सिरीज अायाेजित करण्यात अाली हाेती.


  राहुल, रैनाचा झंझावात
  भारताच्या सलामीवीर लाेकेश राहुल अाणि सुरेश रैनाने झंझावाती खेळी केली. यासह त्याने वैयक्तिक अर्धशतकेही झळकावली. राहुलने ३६ चेंडूंचा सामना करताना ३ चाैकार अाणि ६ षटकारांसह ७० धावा काढल्या. रैनाने ४५ चेंडूंत ५ चाैकार व ३ षटकारांच्या अाधारे ६९ धावांची खेळी केली.


  भारत फायनलमध्ये; विंडीजवर २०३ धावांनी मात
  अय्यरच्या नेतृत्वात भारत अ संघाने शुक्रवारी २०३ धावांनी विंडीज अ संघावर मात करून तिरंगी मालिकेची अंतिम फेरी गाठली. अक्षर (४/२४)व चाहरच्या (२/२१) बळावर विंडीजचा धुव्वा उडाला. भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३५४ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात विंडीज अ संघाला १५१ धावांवर गाशा गुंडाळावा लागला. २ जुलै राेजी भारत-इंग्लंड फायनल हाेईल.

Trending