आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिखर धवनच्या अर्धशतकाने टीम इंडियाचा बांगलादेश संघावर विजय; धवनच्या 55 धावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलंबाे- जयदेव उनाडकतच्या (३/३८) धारदार गाेलंदाजीपाठाेपाठ शिखर धवनच्या (५५) अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने गुरुवारी तिरंगी मालिकेमध्ये विजयाचे खाते उघडले. सलामीच्या पराभवातून सावरलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर मात केली. टीम इंडियाने १८.४ षटकांत ६ गड्यांनी सामना जिंकला. दोन विकेट घेणारा विजय शंकर सामनावीरचा मानकरी ठरला. भारताला सलामीच्या लढतीत यजमान श्रीलंकेने पराभूत केले हाेते. अाता भारताचा मालिकेतील तिसरा सामना १२ मार्च, साेमवारी यजमान श्रीलंकेशी हाेईल. 

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने ८ बाद १३९ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात भारताने ४ गड्यांच्या माेबदल्यामध्ये विजयाचे लक्ष्य गाठले. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने शानदार अर्धशतक ठाेकले. 


धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताला सलामीवीर कर्णधार राेहित शर्मा अाणि धवनने दमदार सुरुवात करून दिली. १७ धावांचे याेगदान देऊन राेहित परतला.  ऋषभ पंत ७ धावांवर बाद झाला.
शिखर धवन-रैनाची अर्धशतकी भागीदारी भारताच्या विजयासाठी शिखर धवन अाणि सुरेश रैनाने कंबर कसली. या दाेघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचली. यासह त्यांनी टीमच्या विजयाचा मार्ग सुकर केला. रैनाने २७ चेंडूंचा सामना करताना प्रत्येकी एक चाैकार अाणि षटकाराच्या अाधारे २८ धावांची खेळी केली. त्यांनी श्रीलंकेच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना तुफानी फटकेबाजी केली.

 

धवनचा झंझावात; ४३ चेंडूंत ५५ धावा
भारताच्या सलामीवीर शिखर धवनने दुसऱ्या सामन्यात झंझावाती खेळी केली. त्याने ४३ चेंडूंत ५५ धावा काढल्या. यामध्ये पाच चाैकार अाणि दाेन षटकारांचा समावेश अाहे. यासह त्याने टीमचा विजय जवळपास निश्चित केला. या वेळी त्याला मनीष पांडेने माेलाची साथ दिली.

 

जयदेव चमकला
युवा गाेलंदाज जयदेव उनाडकतने चमकदार कामगिरी केली. त्याने धारदार गाेलंदाजी करताना ४ षटकांत ३८ धावा देताना ३ बळी घेतले. त्यापाठाेपाठ विजय शंकरने दाेन विकेट घेतल्या.  शार्दूल ठाकूर अाणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी एक बळी घेतला.

 

लिटाेन, शब्बीर झुंज 
बांगलादेशच्या  लिटाेन दास व शब्बीर रहमानने एकाकी झुंज दिली.यासह त्यांनी टीमच्या धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न केला. दासने ३० चेंडूंमध्ये  ३४ धावा काढल्या.  त्यापाठाेपाठ शब्बीरने २६ चेंडूंत ३० धावा काढल्या.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक...

बातम्या आणखी आहेत...