आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलदीपचा षटकार, राेहित शर्माचे शतक; टीम इंडियाची सलामीला इंग्लंडवर मात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाॅटिंगहॅम- यजमान इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका विजयाने फाॅर्मात असलेल्या टीम इंडियाने गुरुवारी वनडेत नंबर वन हाेण्याच्या अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. भारताने सलामीच्या वनडे सामन्यात यजमान इंग्लंडला धूळ चारली. भारताने ८ गड्यांनी सलामीचा सामना जिंकला. यासह पाहुण्या टीम इंडियाने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता या दाेन्ही संघातील दुसरा वनडे सामना शनिवारी हाेणार अाहे. 


सामनावीर कुलदीप यादव (६/२५) अाणि सलामीवीर राेहित शर्माच्या (नाबाद १३७) शतकाच्या बळावर टीम इंडियाने मालिकेत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने ४९.५ षटकांत २६८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने २ गड्यांच्या माेबदल्यात ४०.१ षटकांत विजयाचे लक्ष्य सहज गाठले. संघाच्या विजयात कर्णधार काेहलीने ७५ धावांची खेळी केली. 


कुलदीप यादवचे ६ बळी 
भारताकडून कुलदीपने धारदार गाेलंदाजी केली. त्याने १० षटकांत २५ धावा देत ६ बळी घेतले. तसेच उमेश यादवने २ गडी बाद केले. याशिवाय यजुवेंद्र चहलने १ गडी बाद केला. 


राेहित शर्माचे १८ वे शतक 
भारताच्या सलामीवीर राेहित शर्माने वनडे करिअरमधील १८ वे शतक साजरे केले. त्याने ११४ चेंडूंत नाबाद १३७ धावा काढल्या. यात १५ चंाैकार व ४ षटकारांचा समावेश अाहे. त्याने विजय निश्चित केला. 

 

अाठवडाभरात सलग दुसऱ्या मालिका विजयाची अाहे संधी! 
जबरदस्त फाॅर्मात असलेल्या भारतीय संघाला अाता अाठवडाभरात सलग दुसरी मालिका अापल्या नावे करण्याची संधी अाहे. भारताने रविवारी तिसरा सामना जिंकून टी-२० मालिका २-१ ने जिंकली. अाता १४ जुलै, उद्या शनिवारी वनडे मालिकेतील दुसरा सामना रंगणार अाहे. या सामन्यातील विजयाने भारताला या मालिकेत विजयी अाघाडी घेता येईल. त्यामुळे मालिका विजयाच्या उंबरठ्यावर असलेला भारतीय संघ अापली ही माेहीम फत्ते करण्यासाठी सज्ज अाहे. इंग्लंडसाठी हा सामना निर्णायक असेल. 

बातम्या आणखी आहेत...