Home | Sports | From The Field | Team India ready to win series

टी-२० मालिका : मालिका विजयासाठी अाज टीम इंडिया सज्ज; १-० ने अाघाडी

वृत्तसंस्था | Update - Jun 29, 2018, 06:50 AM IST

सलामीच्या विजयाने फाॅर्मात असलेला भारतीय संघ अाता दुसऱ्या सामन्यात बाजी मारून मालिका अापल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला अ

 • Team India ready to win series

  मलाहिडे (डबलीन)- सलामीच्या विजयाने फाॅर्मात असलेला भारतीय संघ अाता दुसऱ्या सामन्यात बाजी मारून मालिका अापल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला अाहे. भारताचा दुसरा टी-२० सामना शुक्रवारी अायर्लंड संघाशी हाेणार अाहे. हे दाेन्ही संघ अाज समाेरासमाेर असतील. अायर्लंड टीमला मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. भारताने सरस खेळी करताना पहिला सामना जिंकला.


  यासह भारताला दाेन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी मिळाली. अाता मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजयासाठी भारताच्या खेळाडूंनी कंबर कसली अाहे. भारताने ६२ धावांनी सलामीचा सामना जिंकला.


  विराट काेहलीच्या नेतृत्वात भारतीय युवांची कामगिरी काैतुकास्पद ठरली. युवा गाेलंदाजांनी सरस खेळी करताना अायर्लंडच्या टीमला झटपट राेखण्याची किमया साधली. यामुळे भारताला सहज विजय नाेंदवता अाला. या मालिका विजयानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका खेळणार अाहे. याची तयारी भारताचा संघ अाता करत अाहे.


  कुलदीप, चहलवर नजर
  भारताच्या युवा गाेलंदाज यजुवेंद्र चहल अाणि कुलदीप यादववर सर्वांची नजर असेल. त्यांनी धारदार गाेलंदाजी करताना सलामीला निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. कुलदीपने ४ विकेट घेतल्या. तसेच चहलने ३ गडी बाद केले.

Trending