आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया 12 वर्षांत प्रथमच टी-20 ची तिरंगी मालिका खेळणार, उद्या श्रीलंकेशी सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीलंकेला रवाना हाेण्यापूर्वी कर्णधार राेहित शर्मासह टीम इंडियाचे युवा खेळाडू. - Divya Marathi
श्रीलंकेला रवाना हाेण्यापूर्वी कर्णधार राेहित शर्मासह टीम इंडियाचे युवा खेळाडू.

काेलंबाे - राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया १२ वर्षांमध्ये प्रथमच टी-२० च्या तिरंगी मालिकेसाठी मैदानावर उतरणार अाहे. उद्या मंगळवारपासून श्रीलंकेमध्ये टी-२० च्या तिरंगी मालिकेला सुरुवात हाेत अाहे.  

 

भारत अाणि यजमान श्रीलंका यांच्यात सलामीचा सामना रंगणार अाहे. गत २००६ पासून टी-२० च्या फाॅरमॅटमध्ये खेळणारा भारतीय संघ प्रथमच अशा प्रकारची तिरंगी मालिका पहिल्यांदाच खेळत अाहे. भारत, यजमान श्रीलंकेसह बांगलादेशच्या टीमचा या मालिकेमध्ये सहभाग अाहे.


कसाेटी खेळणाऱ्या १० संघांमध्ये भारताशिवाय दक्षिण अाफ्रिका अाणि विंडीज संघानेही अातापर्यंत अशा प्रकारची मालिका खेळली नाही.


श्रीलंकेला ५० काेटींचा फायदा : या मालिकेतून श्रीलंकन क्रिकेट मंडळाला ५० काेटींचा फायदा हाेणार अाहे. टीम इंडियाच्या सहभागामुळे श्रीलंकेला काेट्यवधीच्या कमाईची संधी मिळाली अाहे.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गत वर्षी अायसीसीच्या गर्व्हेनर्स माॅडेल माेहिमेला विराेध दर्शवला हाेता. या भूमिकेला त्यादरम्यान श्रीलंकन मंडळाचे पाठबळ हाेते. त्याचा श्रीलंकेला अाता फायदा झाला. 

 

चार विजयाने टीम इंडिया करेल दक्षिण अाफ्रिकेचा विक्रम ब्रेक

भारताने टी-२० क्रिकेटमध्ये ९४ सामने खेळले अाहेत.  ५७ सामन्यात भारताचा विजय झाला. तसेच ३४ सामन्यात टीम इंडियाला पराभवाला समाेरे जावे लागले. अाता भारताने मालिकेतील चार सामने जिंकले, तर टी-२० सामने जिंकणाऱ्या संघाची भारताच्या नावे नाेंद हाेईल. यामुळे टीम इंडिया यात अाफ्रिकेलाही मागे टाकू शकेल. अाफ्रिकेच्या नावे १०३ सामन्यात ६० विजयाची नाेंद अाहे. १२३ सामन्यात ७४ विजयासह पाक  अव्वल स्थानी अाहे.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, धाेनीला ५०० व्या अांतरराष्ट्रीय सामन्यासाठी जुलैमध्ये संधी...

 

बातम्या आणखी आहेत...