आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्र ठरले गाेल्डन; टीम इंडिया सलग 2 वर्षे सर्वाधिक सामने जिंकणारा संघ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली- ज्या पद्धतीने १९७० ते ८० च्या दशकात वेस्ट इंंडीज अाणि अाॅस्ट्रेलियाने २००८-०९ चा काळ अापल्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर गाजवला त्याच प्रकारे टीम इंडियाची यंदाच्या सत्रातील कामगिरी ठरली. भारताने सलग दाेन वर्षे अापल्या दर्जेदार कामगिरीची लय कायम ठेवताना सर्वाधिक विजय संपादन करणारा संघ हाेण्याचा बहुमान पटकावला. उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर भारताने सत्रात सामन्यागणिक विजयाची नाेंद केली.  भारताने सत्रात विक्रमी १४ मालिका विजय संपादन करण्याचा पराक्रमही यशस्वीरीत्या गाजवला.  अाता ही लय अागामी नव्या सत्रातही कायम ठेवण्याचा काेहलीचा प्रयत्न असेल.

 

कसाेटीतही पहिल्यांदा भारताने सर्वाधिक विजय
क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्येे सरस खेळी करताना दाेन्ही सत्रे भारताने गाजवली. यात कसाेटी क्रिकेटचाही समावेश अाहे. भारताची यामधील कामगिरीही उल्लेखनीय ठरली. भारताने २०१६ मध्ये ९ कसाेटी जिंकल्या. हे भारताचे सर्वाधिक विजय ठरले. २०१७ मध्ये सात कसाेटी जिंकल्या अाहेत. हे अातापर्यंतचे सर्वाधिक कसाेटी विजय ठरले अाहेत.  

 

प्रथम सलग २ वर्षे सर्वाधिक जिंकले सामने 
भारताने २०१७ मध्ये क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅट मिळून ३७ सामने जिंकले अाहेत. त्यामुळे हे काेणत्याही इतर संघांपेक्षा अधिक विजय ठरले. भारताने गतवर्षी २०१६ मध्ये ३१ सामने जिंकले हाेते. अाता तिन्ही फाॅरमॅटमध्ये भारताने सरस खेळी करताना अापल्या नावे विक्रमाची नाेंद केली. त्यामुळे भारताने पहिल्यांदा दाेन सत्रांत सर्वाधिक सामने जिंकले अाहेत.

 

वनडे : १२४ विजय, सर्वाधिक
भारत क्रिकेटच्या इतिहासात दशकातील (२०१० ते १७) यशस्वी संघ राहिला अाहे. या दशकात भारताने २०१ सामने खेळले. यातील १२४ सामन्यांत भारताला विजय संपादन करता अाला. १८० सामन्यांत १०७ विजयाने अाॅस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी अाहे. श्रीलंकेला १०० विजय २१८ सामन्यांत मिळाले.  भारताच्या विजय-पराभवाची सरासरी १.८५० अशी राहिली अाहे. भारताने  तिन्ही फाॅरमॅटच्या ३५७ सामन्यांत २१० विजय मिळवून अव्वल स्थान गाठले. कसाेटीत अाॅस्ट्रेलिया ४६ व भारताचे ४२ विजय अाहेत.

 

२०१० पासून अाजपर्यंतचा विक्रम 

कर्णधार : महेंद्रसिंग धाेनी अाघाडीवर  

> ७१  वनडे भारताने कर्णधार महेंद्रसिंग धाेनीच्या नेतृत्वात जिंकलेे. या कालावधीमध्ये हे विजय सर्वाधिक ठरले.

> ३२ टी-२० लढतीत धाेनीने भारताला २०१०-१७ मध्ये विजय मिळवून दिले. दशकात सर्वात यशस्वी कर्णधार. 

 

फलंदाज : विराट काेहली सर्वाेत्कृष्ट  

 

> १५,७७० धावा विराट काेहलीने २०१० ते २०१७ पर्यंत काढल्या. जगातील सर्वाधिक. 

>  ५१ शतके विराट काेहलीची २०१० ते २०१७ पर्यंत जगातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी 

बातम्या आणखी आहेत...