आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय संघाने पुन्हा टाकल्या नांग्या,187 धावांवर ढेपाळला;कोहली, पुजाराची अर्धशतके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग- भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या तीन कसोटी मालिकेच्या अंतिम कसोटीत पहिल्याच दिवशी ढेपाळला. भारताचा डाव १८७ धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिका टीम भारतीय संघाला व्हॉइटवॉश देण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे. 


भारताने नाणेफेक जिंकून हिरव्यागार खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी घेतली. रात्री आणि सकाळी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. अशा परिस्थितीतही भारताने फलंदाजीचा कठीण निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर लोकेश राहुल भोपळाही फोडू शकला नाही. दुसरा सलामीवीर मुरली विजय अवघ्या ८ धावा करून परतला. त्याला रबडाने तंबूत पाठवले. फिलेंडर व मोर्केलने जोरदार माऱ्यापुढे भारताने ८.४ षटकांत १३ धावांवर दोन गडी गमावले. चेतेश्वर पुजाराने  १७९ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार खेचत ५० धावा काढल्या. कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा अर्धशतक झळकावले. त्याने १०६ चेंडूत  ९ चौकार लगावत ५४ धावा झळकावल्या. त्याला लंुगीने डिव्हिलर्स करवी झेल बाद केले. कोहली आणि पुजारा या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागिदारी रचली. 

 

अजिंक्य अपयशी
संघात रोहित शर्माच्या जागी स्थान देण्यात आलेला अजिंक्य रहाणे अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्याला एक जीवनदानदेखील मिळाले होते. मात्र तो अवघ्या ९ धावांवर तंबूत परतला. त्याला माेर्केलने पायचीत केले. भारताचे सहा फलंदाज बॅटची कड घेत यष्टिरक्षकाच्या हाती झेलबाद झेले. 

 

 

कॅगिसो रबाडा, फिलेंडर चमकले 
दक्षिण अाफ्रिकेकडून कॅगिसो रबाडाने १९ षटकांत ३९ धावा देत ३ गडी बाद केले. माेर्केलने ४७ धावांत २ विकेट घेतल्या. फिलेंडर, अॅडिले यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. लंुगीनेदेखील एक विकेट काढली.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक...

बातम्या आणखी आहेत...