आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIFA WORLD CUP : आज फायनल गोल; फ्रान्‍स-क्रोएशिया यांच्‍यात लढत, विजेत्‍याला 256 कोटींचे बक्षीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को- १ महिना व ६३ सामन्यांनंतर रविवारी वर्ल्डकपचा अंतिम सामना असेल. फ्रान्स वि.क्रोएशिया यांच्यात विजेतेपदाची लढत सोनी टेन-२/३ वर लाइव्ह असेल. आजवर ३ अब्ज लोकांनी वर्ल्डकप पाहिला आहे. १५० कोटी प्रेक्षक फायनल पाहू शकतात.
- क्राेएशिया फायनल खेळणारा दुसरा सर्वात छोटा देश आहे. (लोकसंख्या ४१.४ लाख) उरुग्वेनेही (३४ लाख) फायनल खेळलेली आहे.

 

जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असलेल्या क्राेएशियाने करिअरमध्ये पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या अंतिम फेरीचा पल्ला गाठला अाहे. त्यामुळे अाता विश्वचषकाचा बहुमान मिळवण्याचे एेतिहासिक यश संपादन करण्यावर या संघाची नजर अाहे. त्यासाठी या संघाचे खेळाडू सज्ज झाले अाहेत. दुसरीकडे १९९८ च्या वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स संघाला दुसऱ्यांदा विश्वविजेता हाेण्याची अाशा अाहे. 

 

फ्रान्सची २० वर्षांत तिसरी फायनल
फ्रान्स गेल्या २० वर्षांत ५ मोठ्या फायनल खेळलेला आहे. तो २० वर्षांत तिसऱ्यांदा वर्ल्डकप फायनल खेळेल. १९९८ मध्ये विजेता व २००६ मध्ये उपविजेता होता. तो यजमान असताना किताब जिंकणारा शेवटचा देश आहे. २००० मध्ये  युरो चॅम्पियन व २०१६ मध्ये युरो कपचा उपविजेता आहे.

 

फायनल खेळणारा क्रोएशिया १३ वा
आजवरच्या २० वर्ल्डकपमध्ये १२ संघ फायनलमध्ये गेले, पैकी ८ विजेते बनले. या २१ व्या वर्ल्डकपमध्ये फायनल खेेळणारा क्रोएशिया १३ वा संघ आहे. गेल्या दोन वेळेस प्रथमच फायनल खेळणाऱ्या संघांनी किताब जिंकला अाहे. १९९८मध्ये फ्रान्स आणि २०१० मध्ये स्पेन जिंकले होते.

 

वर्ल्डकपमध्ये दुसरी लढत
वर्ल्डकपमध्ये दोन्ही देश दुसऱ्यांदाच समोरासमोर येतील. पहिल्यांदा १९९८ वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये त्यांची लढत झाली होती. त्या सामन्यात बढत घेऊनही क्रोएशिया १-२ ने हरला होता. उभय संघांत एकूण ५ सामने झाले. पैकी ३ फ्रान्सने जिंकले, २ ड्रॉ राहिले. क्रोएिशया पहिल्या विजयाच्या शोधात आहे.

 

गत दाेन फर्स्ट टाइम फायनलिस्टने जिंकला किताब
- क्राेएशिया हा वर्ल्डकप फायनल खेळणारा १० वा युराेपिय अाणि एकूण १३ वा संघ ठरणार अाहे. गत दाेन वेळा फर्स्ट टाइम फायनलिस्टने किताब जिंकले. १९९८ मध्ये फ्रान्स व २०१० मध्ये स्पेनने हे यश संपादन केले.
- क्रोएशिया : फ्रान्स अाणि क्राेएशिया यांच्यात पाच सामने झालेत. यातील तीनमध्ये फ्रान्स संघ विजयी झाला. तर दाेन सामने बराेबरीत राहिले.
- फ्रान्स अाणि क्राेएशिया यांच्यात दाेन माेठे सामने अांतरराष्ट्रीय स्पर्धेत झाले अाहेत. यात १९९८ च्या वर्ल्डकप सेमीफायनल (फ्रान्स विजयी) अाणि २००४ च्या युराे कपचा समावेश अाहे. युराेचा सामना  बराेबरीत राहिला हाेता.
- मागील तीन विश्वचषकाची फायनल एक्स्ट्रा टाइमपर्यंत रंगली अाहे.  दाेन वर्ल्डकप फायनलचे निकाल पेनल्टी शूटअाऊटमध्ये लागले. १९९४ मध्ये ब्राझीलने व २००६ ला शूटअाऊटमध्ये इटलीने मात केली.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, इंग्लंडचा पराभव करत बेल्जियम तिसऱ्या स्थानी...

 

बातम्या आणखी आहेत...