आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- गतवर्षी अायसीसीच्या चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाला अनपेक्षितपणे पाककडून पराभव पत्करावा लागला. यादरम्यान ‘मिडल’ शब्दाला भारतीय संघातील सर्वात माेठी दुबळी बाजू मानले जात हाेते. गाेलंदाजीमध्ये मिडल अाेव्हर अाणि फलंदाजीमध्ये मिडल अाॅर्डर. भारताचे खेळाडू मिडल अाेव्हर म्हणजेच ११ ते ४० च्या षटकात अधिक विकेट घेण्यात अपयशी ठरत हाेते. तसेच अाघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर मिडल अाॅर्डरच्या फलंदाजांना अाव्हान कायम ठेवता येत नव्हते. मात्र, अाता याच दुबळ्या बाजूल दूर करत भारतीय संघाने अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावला. त्यामुळेच अाता भारताचा संघ बलाढ्य मानला जाऊ लागला.
युवा खेळाडू कुलदीप यादव अाणि यजुवेंद्र चहलच्या अागमनामुळे टीमची मिडल अाेव्हरमधील विकेट न घेण्याची बाजू सावरली गेली. त्यांनी टीमकडून वेळाेवेळी उल्लेखनीय कामगिरी करताना यादरम्यान विकेट घेण्यात यश संपादन केले. त्यामुळेच चॅम्पियन्स ट्राॅफीनंतर झालेल्या २७ पैकी २१ वनडेमध्ये भारताने विजय संपादन केले. पाचच सामन्यांत टीमचा पराभव झाला.
कुलदीप अाणि यजुवेंद्र चहल यांना दाेन दिग्गजांच्या जागी संघात स्थान मिळाले. त्यांना वनडेत १५५ विकेट घेणाऱ्या रवींद्र जडेजा अाणि १५० विकेट घेणाऱ्या अार. अश्विनच्या जागी खेळण्याची संधी मिळाली.
> २० बळी कुलदीपचे फलंदाज ९ वा त्यापेक्षा कमी धावांवर खेळतानाचे अाहेत. यात सहा फलंदाज तर शून्यावर बाद झाले.
> १४ गडी यजुवेंद्र चहलने फलंदाज एकेरी धावांवर असताना घेतले. यातील दाेघे फलंदाज तर शून्यावरच बाद झाले.
कुलदीप यादव टॉप विकेट टेकर
युवा गाेलंदाज कुलदीप यादवने अापला दबदबा निर्माण केला. त्याने २० सामन्यांत खेळताना ३९ विकेट घेतल्या. यामध्ये ताे अव्वल गाेलंदाज ठरला. त्यापाठाेपाठ चहलने २० सामन्यांत ३७ बळी घेतले.
चार वेगवेगळ्या देशांत विजय
भारताने २७ सामने वेगवेगळ्या देशांमध्ये खेळले. टीमने अाॅस्ट्रेलिया व इंग्लंडला हरवले. दाैऱ्यात अाफ्रिकेने विंडीजवर मात. श्रीलंकेला त्यांच्या मैदानावर व त्यानंतर अापल्या मैदानावर धूळ चारली.
पुढील स्लाइडवर पाहा, अशा विकेट मिळवल्या कुलदीप व चहलने...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.