आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 वर्षांखालील विश्वकरंडक; भारत चौथ्यांदा जगज्जेता, हा पराक्रम करणारा पहिला संघ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्ल्डकपमधून भारताला तीन नवे हिरे सापडले. - Divya Marathi
या वर्ल्डकपमधून भारताला तीन नवे हिरे सापडले.

माउंट मनगुनई- भारताने ऑस्ट्रेलियाला हरवत चौथ्यांदा १९ वर्षांखालील विश्व करंडक जिंकला आहे. भारताने शनिवारी अंतिम सामना ८ गडी राखून जिंकला. मनजोत कालरा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने १०१ धावांची नाबाद खेळी केली.  तो उन्मुक्त चंदनंतर अंतिम सामन्यात शतक करणारा दुसरा भारतीय ठरला. भारताने याआधी २०००, २००८ आणि २०१२ मध्ये हा किताब जिंकला आहे.

 

> बीसीसीआयने प्रशिक्षक राहुल द्रविडला ५० लाख आणि सर्व खेळाडूंना ३०-३० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

 

> भारताच्या विजयाची ही आहेत वैशिष्ट्ये

कोणत्याही संघाचा सर्वात मोठा विजय
हा १९ वर्षांखालील विश्व चषकाच्या अंतिम सामन्यातील सर्वात मोठा विजय. बळींच्या हिशेबाने सर्वात मोठ्या विजयाचे रेकॉर्ड इंग्लंड (१९९८) आणि ऑस्ट्रेलियाच्या (२००२) नावे होते. दोन्ही संघांनी अंतिम सामना ७-७ विकेटने जिंकला होता.

 

एकही सामना न गमावता जेतेपद
भारतीय संघाने तिसऱ्यांदा एकही सामना न गमावता विश्व चषक जिंकला. २०००, २००८ आणि २०१८ मध्ये भारताची अशी कामगिरी. ऑस्ट्रेलियाने २००२ मध्ये अशी कामगिरी केली होती. इतर कुठल्याही संघाच्या नावावर ती नाही.

 

प्रतिस्पर्धी संघाला दरवेळी केले सर्वबाद
भारतीय संघ या स्पर्धेत सहा सामने खेळला. दरवेळी प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट केले. असे करणारा एकमेव संघ. भारताचे संपूर्ण स्पर्धेत फक्त २९ फलंदाज बाद झाले.

१०० किंवा त्याहून जास्त धावांनी विजय भारताने स्पर्धेतील सर्व ६ सामने एकतर्फी जिंकले. त्याने तीन सामने १०० किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी जिंकले. दोन सामने १०-१० विकेटने तर अंतिम सामना ८ विकेटने जिंकला.

 

> स्पर्धेशी संबंधित चार रंजक बाबी

कसोटी- वन डेमध्ये डेब्यूही करू शकत नाही

याआधीच्या तिन्ही फायनलमध्ये सामनावीर खेळाडू कारकीर्द बनवू शकले नाहीत. वर्ष २००२ मध्ये रितिंदर सोढी कसोटीत डेब्यूही करू शकला नाही. २००८ मध्ये अजितेश अर्गल आणि २०१२ मध्ये उन्मुक्त चंद वनडे, कसोटी दोन्हीतही येऊ शकले नाही.

 

२०१२ मध्ये एकही स्टार खेळाडू मिळाला नाही
मोहंमद कैफ, युवराजसिंग, विराट कोहली, रवींद्र जडेजासारखे मोठे खेळाडू या स्पर्धेतून मिळाले. २०१२ मध्ये भारतीय संघ अंडर-१९ मध्ये तर जिंकला, पण जो वनडे आणि कसोटीत प्रवेश मिळवू शकेल असा एकही स्टार खेळाडू मिळाला नाही.

 

विश्वविजेते होण्याआधीच झाले करोडपती
यंदाच्या अंडर-१९ संघातील ६ खेळाडूंची आधीच आयपीएलसाठी निवड. सर्वात महाग कमलेश नागकरकोटीला केकेआरने ३.२ कोटींत खेरदी केले आहे. शुभमन गिल, शिवम मावी, पृथ्वी शॉ, अनुकूल रॉय आणि मनजित कालराही आयपीएलमध्ये आहेत.

 

हे खेळाडू अंडर-१९ नंतर इतर संघात 
इंग्लंडचा इयान मॉर्गन २००४ मध्ये आयर्लंडतर्फे अंडर-१९ विश्वकप खेळला. दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर १९९८ मध्ये पाकिस्तानसाठी अंडर-१९ वर्ल्ड कप खेळला. इंग्लंडचा गॅरी बॅलन्सही झिम्बाब्वेकडून खेळला आहे. असे अनेक खेळाडू आहेत.

 

हेही वाचा, 
भारताचा 35 वर्षांत अाठवा वर्ल्डकप; अाॅस्ट्रेलिया टीमचा 8 गड्यांनी केला पराभव...

 

बातम्या आणखी आहेत...