आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवांचा विश्वचषक उद्यापासून; ज्युनियर स्तरावरील सर्वात माेठी अांतरराष्ट्रीय स्पर्धा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन- अायसीसीच्या १२ व्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात हाेत अाहे. ही स्पर्धा न्यूझीलंडमध्ये अायाेजित करण्यात अाली. या स्पर्धेत प्रत्येकी तीन वेळच्या चॅम्पियन भारतासह अाॅस्ट्रेलियाचा समावेश अाहे. तसेच न्यूझीलंड अाणि पाकिस्तानचा युवा संघही या स्पर्धेत सहभागी हाेत अाहे. या चार टीमला यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानले जात अाहे. त्यामुळे यंंदाची ही स्पर्धा अधिक रंगतदार  हाेण्याची शक्यता अाहे. ज्युनियर स्तरावरील ही स्पर्धा अांतरराष्ट्रीय स्तरावरची सर्वात माेठी मानली जाते.   


मुंबईचा युवा खेळाडू पृथ्वी शाॅच्या नेतृत्वाखाली गत वेळचा उपविजेता भारतीय संघ या स्पर्धेत अापले काैशल्यपणास लावणार अाहे. यंदाच्या स्पर्धेत भारताच्या युवा संघाला किताबाची अाशा अाहे. त्यासाठी भारताचे युवा सज्ज झाले.   


भारताचा सलामी सामना रविवारी अाॅस्ट्रेलियाशी हाेणार अाहे. या सामन्यातून भारताला  जेतेपदाच्या अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याची संधी अाहे. नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात भारताची कामगिरी सरस ठरली. भारताने सरावात अाफ्रिकेवर माेठ्या फरकाने मात केली. यात ईशानची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्यामुळे अापली हीच लय अागामी सामन्यातही कायम ठेवण्याचा भारताच्या युवांचा प्रयत्न असेल. त्यासाठी भारताच्या युवा संघाने कसून सराव केला अाहे. अाता रविवारी विजयावर या युवांची नजर असेल.

 

या चार खेळाडूंवर असेल सर्वांची नजर 

पृथ्वी शाॅ, भारत : पहिल्या रणजी सत्रात ९४१ धावा काढल्या., नाेव्हेंबर, २०१३ मध्ये हॅरिस शिल्डमध्ये १४ व्या वर्षी ५४६ धावांची खेळी करून फाेकसमध्ये अाला. येथूनच त्याने सातत्याने उल्लेखनीय कामगिरीची लय कायम ठेवली अाणि वर्ल्डकपसाठी भारताच्या नेतृत्वाची धुरा संपादन केली. यंदा पहिल्याच रणजी सत्रातील १८ डावांत ५६.५२ च्या सरासरीने ९६१ धावा काढल्या. दुलीप ट्राॅफी फायनलमध्ये सचिनच्या विक्रमाला ब्रेक करणारा सर्वात युवा शतकवीर ठरला. 

 

लाेकप्रियतेमध्ये युवांच्या वर्ल्डकपला अधिक पसंती 
ज्युनियर स्तरावरचा हा वर्ल्डकप अधिक लाेकप्रिय मानला जाताे. कारण, या वर्ल्डकपमधील प्रतिभावंतांना पुढे सीनियर संघात स्थान मिळवता अाले अाहे. अाजच्या घडीला दहा कसाेटी संघांतील ९ कर्णधार हे या वर्ल्डकपमधील प्रतिभावंत खेळाडू हाेते. या कामगिरीमुळे त्यांना सीनियर टीममध्ये उल्लेखनीय यश संपादन करता अाले.

 

अाफ्रिदी, पाकिस्तान : वेगवान गाेलंदाज   
१७ वर्षीय शाहीन अाफ्रिदीला अाता पाकचा भविष्यातील वसीम अक्रम मानले जाते. ६ फूट, ६ इंच उंचीच्या या युवामध्ये १४० किमी/प्रतितासाच्या वेगाने गाेलंदाजी करण्याची क्षमता अाहे. तसेच चेंडूला स्विंग करण्याची शैलीही त्याने अवगत केली अाहे. त्यामुळे ताे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांसाठी मैदानावर अधिकच धाेकादायक ठरू शकताे. अाता त्याच्यावर स्पर्धेत सर्वांची नजर असेल. 

 

अाॅस्ट्रिन, अाॅस्ट्रेलिया नावातच यश दडलेले    
अाॅस्ट्रिन वाॅ हा युवा अाॅस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज कर्णधार स्टीव वाॅचा मुलगा अाहे. ताे अापल्या वडिलांप्रमाणेच अाॅलराउंडर अाहे. त्याच्या नावे १७ वर्षांखालील क्रिकेटमध्ये नाबाद शतकाची नाेंद अाहे. जेसन संघासाेबतच अाॅस्ट्रेलियन टीमच्या नेतृत्वाची धुरा त्याच्यावर अाहे. अाॅस्ट्रेलियन टीममध्ये मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा मुलगाही अाहे.  

 

 

थांडाे, द. अाफ्रिका : वडिलांसारखी कामगिरी   
दक्षिण अाफ्रिकेचा वेगवान गाेलंदाज मखाया एनटीनीचा मुलगा थांडा अाता १३० िकमी/प्रतितासाच्या वेगाने गाेलंदाजी करताे. अाफ्रिकेच्या युवाकडून खेळताना त्याने पहिल्याच सामन्यात विंडीजविरुद्ध चार विकेट घेतल्या. त्याने अनेक वेळा अाफ्रिकेच्या सीनियर टीमसाेबतही नेटवर सराव केला.

बातम्या आणखी आहेत...