आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • West Indies Spark Spirit Of Cricket Debate With Dismissal Of South African Batsman

तुम्हाला माहित आहेत का क्रिकेटचे हे नियम? फलंदाज होऊ शकतो 12 प्रकारे बाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या 19 वर्षाखालील विश्वकरंडक युवा क्रिकेट स्पर्धेत आपल्याजवळ थांबलेला बॉल फलंदाजाने यष्टिरक्षकाकडे दिला. त्याच्या या कृतीबद्दल त्याला क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल पंचांनी बाद दिले. यामुळे आता आता या नियमात बदल करण्याची सूचना बादचा निर्णय मिळवलेल्या विंडीजच्या माजी क्रिकेटपटूंसह अनेकांनी केली आहे. काय घडले, कसे दिले बाद....

 

- दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जीवेशन पिल्ले याने विडींजच्या हॉयते याला कव्हरमधून फटकवण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागला. तेथून तो पॅडला लागून यष्टींजवळ पडला. 
- पिल्लेने यष्टींवर जाणारा चेंडू रोखला. चेंडू जागेवर स्थिर असताना ( क्रिकेटच्या भाषेत मोशनलेस) तो पिल्लेने उचलला आणि यष्टिरक्षकाकडे उचलून फेकला.
-  मात्र, विडींजच्या यष्टिरक्षक एमानुल स्टुअर्टने याविरोधात अपील केले व पंचाकडे दाद मागितली.
- दोन्ही पंचांनी चर्चा करून हा निर्णय दूरचित्रवाणी पंचाकडे सोपवला. त्यांनी पिल्लेला चेंडू हाताळल्याबद्दल बाद दिले.
- पंचाचा निर्णय नियमानुसार बरोबर होता पण हे क्रिकेटमधील खिलाडूवृत्तीस धरून नाही. खेळाच्या 37.4 नियमानुसार फलंदाजाने क्षेत्ररक्षकाच्या परवानगीशिवाय बॉल हाताळला तर क्षेत्ररक्षणात अडथळा म्हणून बाद ठरवता येते.
- मात्र, क्रिकेटची नियमावली आणि खिलाडूवृत्ती यातील तफावतीवरून वाद सुरू झाला. काहींचे म्हणणे होते पिल्लेने चेंडू हाताळण्याची गरज नव्हती तर काहींचे म्हणणे होते की, चेंडू जर स्थिर (मोशनलेस) होता तर विरोधी संघाला हे माहित होते मग खिलाडूवृत्ती सोडून बादचे अपील करणे नैतिकदृष्ट्या उचित नाही.
- दरम्यान, ज्या यष्टीरक्षकाने बाद देण्याचे अपील केले त्याने मान्य केले मी, अपील करायला नको होतो. पिल्लेने अडवलेला चेंडू स्थिर होता पण त्या वेळी हे घडून गेले. मात्र, यापुढे मी खिलाडूवृत्ती नक्कीच दाखवेन. 

 

फलंदाजाला बाद देण्याचे आहेत अनोखे नियम-

 

- केवळ चेंडू हाताळण्यामुळेच फलंदाजाला बाद दिले जाते असे नाही याशिवायही क्रिकेटमध्ये बाद होण्याचे अनोखे नियम आहेत. 
- या निमित्ताने आम्ही आपल्याला सांगत आहोत क्रिकेटशी संबंधित इंट्रेस्टिंग फॅक्ट्स. जे तुम्हाला क्वचितच माहित असतील. 
- जर एखाद्याने तुम्हाला विचारले की, क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू किती प्रकारे आउट होऊ शकतो? तर तुम्ही त्याला काय उत्तर द्याल? पडला की नाही प्रश्न? तर याचे उत्तर आहे तब्बल 12 प्रकारे... वाटले ना आश्चर्य? हो ते 12 रुल्स आहेत, जे ठरु शकतात बॅट्समन आऊट होण्यास कारणीभूत.

 

चला तर पुढे स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, काय आहेत हे 12 रुल्स, जे ठरतात बॅट्समन आउट होण्यास कारणीभूत...

बातम्या आणखी आहेत...