आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाउंट- पृथ्वी शाॅच्या नेतृत्वाखाली भारतीय युवांनी शुक्रवारी अायसीसीच्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग तिसरा विजय संपादन केला. भारताने स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव केला. भारताने २१.४ षटकांत १० गड्यांनी सामना जिंकला. यासह भारताने अापल्या गटाच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवले.
अनुकूल राॅय (४/२०), अर्शदीप सिंग (२/१०) अाणि अभिषेक शर्मा (२/२२) यांच्या धारदार गाेलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेचा १५४ धावांत खुर्दा उडाला. प्रत्युत्तरात हार्दिक देसाई (५६) व शुभम गिलने (९०) अभेद्य शतकी भागीदारी करून भारताला १० गड्यांनी विजय मिळवून दिला. हा भारताचा सलग तिसरा विजय ठरला. यापूर्वी भारताने अाॅस्ट्रेलिया अाणि पीएनजीचाही पराभव केला अाहे.
धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताकडून शुभम अाणि हार्दिकने झंझावाती खेळी केली. त्यांनी झिम्बाब्वेच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळे भारताला झटपट विजयाची नाेंद करता अाली. नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताच्या युवा गाेलंदाजांनी हा निर्णय साफ चुकीचा ठरवला. त्यांनी माउंटच्या मैदानावर धारदार गाेलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या युवांना स्वस्तात बाद केले. झिम्बाब्वेकडून युवा फलंदाज शुम्बाने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली.
१० गड्यांनी सलग दुसरा विजय मिळवला
भारतीय युवांनी वर्ल्डकपमध्ये सलग दुसऱ्या सामन्यात १० गड्यांनी विजयाची नाेंद केली. यासह भारताने वर्ल्डकपमध्ये सलग दाेन वेळा १० गड्यांनी सामना जिंकण्याच्या इंग्लंड टीमच्या विक्रमाची बराेबरी साधली. इंग्लंडने ही कामगिरी २००८ मध्ये केेली हाेती. भारताने अाता झिम्बाब्वे अाणि पापुअा न्यूगिनीविरुद्ध असा विजय संपादन केला.
> ९० नाबाद धावांचे शुभमचे याेगदान
> ५६ नाबाद धावांची हार्दिकची खेळी
> ०४ बळी अनुकूल राॅयचे
> १५४ धावांत झिम्बाब्वे युवा टीमचा धुव्वा
शुभमचे दुसरे अर्धशतक
पंजाबच्या १८ वर्षीय फलंदाज शुभम गिलने वर्ल्डकपमध्ये दुसरे अर्धशतक ठाेकले. त्याने शुक्रवारी झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद अर्धशतक साजरे केले. त्याने ५९ चेंडूंचा सामना करताना १४ चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे ९० धावांची खेळी केली. यापूर्वी त्याने सलामीला १४ जानेवारी राेजी तीन वेळच्या चॅम्पियन अाॅस्ट्रेलियाविरुद्ध ६३ धावांची खेळी केली हाेती.
पाकिस्तानची श्रीलंकेवर मात
पाक युवांनी ड गटातील सामन्यात श्रीलंकेवर मात केली. पाक संघाने ३ गड्यांनी सामना जिंकला. अली झार्याब अासिफ (५९) अाणि सलामीवीर झैद अालमच्या (२८) शानदार खेळीच्या बळावर पाकने शानदार विजय संपादन केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४८.२ षटकांत १८८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात पाकने ४३.३ षटकांत ७ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. पाकचा स्पर्धेतील हा दुसरा विजय ठरला. यामुळे पाकला ड गटात चार गुणांसह अव्वल स्थान गाठता अाले. श्रीलंका टीमला गटात दुसऱ्या पराभवाला सामाेरे जावे लागले.
पीएनजीचा ५९ धावांत धुव्वा; अाॅस्ट्रेलिया ३११ धावांनी विजयी
युवा गाेलंदाज राल्सटाेनच्या (७/१५) भेदक माऱ्यामुळे खडतर लक्ष्याचा पाठलाग करताना पापुअा न्यू गिनिअाचा अवघ्या ५९ धावांमध्ये धुव्वा उडाला. यासह तीन वेळच्या विश्वविजेत्या अाॅस्ट्रेलियन युवांनी २४.५ षटकांत ३११ धावांनी विजय संपादन केला. प्रथम फलंदाजी करताना अाॅस्ट्रेलियाने ८ बाद ३७० धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात पीएनजीने ५९ धावांत गाशा गुंडाळला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.