आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑकलंड - ऑस्ट्रेलियाने गुरुवारी इंटरनॅशनल T20 क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हर्समध्ये 244 धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाने 7 बॉल शिल्लक ठेवून हे आव्हान पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने 6 विकेटवर 243 दावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 18.5 ओव्हर्समध्ये पाच विकेट गमावत 245 रन केले आणि मॅच जिंकली. या मॅचमध्ये एकूण 32 षटकारांचा पाऊस पडला. टी-20 च्या 13 वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा हा विक्रम आहे.
फॉरमॅट | टार्गेट चेस | टीम | विरुद्ध |
T-20 | 245/5 | ऑस्ट्रेलिया | न्यूझीलंड |
टेस्ट | 418/7 | वेस्ट इंडिज | ऑस्ट्रेलिया |
वनडे | 438/9 | दक्षिण अाफ्रिका | ऑस्ट्रेलिया |
मॅचमध्ये तयार झाले हे विक्रम
1) 13 वर्षातील सर्वात मोठा रन चेस
- ऑस्ट्रेलियाने 244 धावांचे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण केले. टी20 च्या 13 वर्षांच्या इतिहासातील हा विक्रम आहे. आजपासून 13 वर्षांपूर्वी 17 फेब्रुवारी 2005 ला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातच पहिला टी20 सामना झाला होता.
2) सर्वाधिक षटकारांच्या विक्रमाची बरोबरी
- फिंचने 6 षटकार खेचत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. हा मॅचचा 32 वा सिक्सर होता. एका टी-20 इंटरनॅशनल मॅचमध्ये सर्वाधिक षटकारांच्या वर्ल्ड रेकॉर्डची ही बरोबरी आहे. यापूर्वी ऑगस्ट 2016 मध्ये भारत-वेस्ट इंडिज मॅचमध्ये 32 षटकार लगावले गेले होते.
3) गप्टिल सर्वात यशस्वी बॅट्समैन
मार्टिन गप्टिल 105 इनिंगमध्ये टी20 तील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 73 मॅचमध्ये देशासाठी 2188 धावा केल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.