आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेहलीच्या अर्धशतकाने सावरले; अार. अश्विनचा विकेटचा चाैकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंच्युरियन- सलामीच्या कसाेटीत अपयशी ठरलेल्या कर्णधार विराट काेहलीने रविवारी यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसाेटीत दमदार पुनरागमन केले. त्याने संयमी खेळी करताना शानदार अर्धशतक ठाेकले. त्यामुळे भारताला पहिल्या डावात दिवसअखेर ५ बाद १८३ धावा काढता अाल्या. अाता १५२ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताकडे अद्याप ५ विकेट शिल्लक अाहेत. भारताचा विराट काेहली (८५) अाणि युवा अाॅलराउंडर हार्दिक पांड्या (११) मैदानावर खेळत अाहे. अाफ्रिकेकडून गाेलंदाजीमध्ये केशव महाराज, माेर्कल, कागिसाे रबाडा चमकले. अाफ्रिका संघाने दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ३३५ धावा काढल्या. अश्विनने ४ गडी बाद केले.


प्रत्युत्तरात भारताची पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर लाेकेश राहुल (१०) फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवू शकला नाही. त्याला माेर्कलने झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यापाठाेपाठ चेतेश्वर पुजाराही अापल्या पावली तंबूत परतला. त्याला पहिल्या डावात भाेपळाही फाेडता अाला नाही. टीमला त्याच्याकडून माेठ्या खेळीची अाशा हाेती. मात्र, त्याचा मैदानावर निभाव लागला नाही. धावबाद हाेऊन ताे परतला. 


विराट काेहलीची एकाकी झुंज

सलामीला अपयशी ठरल्यानंतर अाता विराट काेहलीने दुसऱ्या कसाेटीत अापल्या फलंदाजीचा दर्जा उंचावला. त्याने एकाकी झंुज देताना अाफ्रिकेच्या गाेलंदाजांचा समाचार घेतला. त्यामुळे त्याला वैयक्तिक १५ वे अर्धशतकही अापल्या नावे करता अाले. त्याने १३० चेंडूंचा सामना करताना ८ चाैकारांसह ८५ धावांची खेळी केली. त्यामुळे टीमच्या धावसंख्येला गती मिळाली. 

बातम्या आणखी आहेत...