Home | Sports | From The Field | Indian Youth Team won by 281 runs

भारतीय युवा संघाचा २८१ धावांनी विजय, मयंकचे दीड शतक

वृत्तसंस्था | Update - Jun 20, 2018, 08:39 AM IST

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय युवांनी इंग्लंड दाैऱ्यात सलग माेठ्या विजयाची नाेंद केली. भारत अ संघाने दुसऱ्या सराव

 • Indian Youth Team won by 281 runs

  लिसेस्टर- श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय युवांनी इंग्लंड दाैऱ्यात सलग माेठ्या विजयाची नाेंद केली. भारत अ संघाने दुसऱ्या सराव सामन्यात लिसेस्टशायरचा पराभव केला. भारताने २८१ धावांनी सामना जिंकला. यासह भारताने सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली. यापूर्वी भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंड बाेर्ड इलेव्हन संघावर मात केली हाेती.


  मयंक अग्रवाल (१५१), पृथ्वी शाॅ (१३२) अाणि शुभमान गिल (८६) यांच्या झंझावाती खेळीच्या बळावर भारत अ संघाने यजमानांसमाेर विजयासाठी ४५९ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात यजमानांनी ४०.४ षटकांत अवघ्या १७७ धावांवर अापला गाशा गुंडाळला.


  धावांचा पाठलाग करणाऱ्या यजमानांकडून कर्णधार वेल्सने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांचा फार काळ निभाव लागला नाही. त्यामुळे या टीमला झटपट अापला गाशा गुंडाळावा लागला.


  दीपक पुन्हा चमकला
  भारताचा युवा गाेलंदाज दीपक चाहर हा सलग दुसऱ्या सामन्यातही चमकला. त्याने धारदार गाेलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. त्याने गत सामन्यातही धारदार गाेलंदाजी करताना तीन गडी बाद केले. हीच लय कायम ठेवताना त्याने या सामन्यातही लक्षवेधी कामगिरी केली. तसेच प्रसिध, दीपक हुडा, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या.
  सराव सामन्यात लिसेस्टशायरचा उडवला धुव्वा; १७७ धावांवरच उडवला धुव्वा


  मयंकचे दीड शतक
  भारताच्या युवा फलंदाज मयंक अग्रवालने सामन्यात शानदार दीड शतक ठाेकले. त्याने १५५ चेंडूंत १५१ धावा काढल्या. यात १८ चाैकार अाणि ५ षटकारांचा समावेश अाहे. तसेच पृथ्वीने १३२ धावांचे माेलाचे याेगदान दिले.

Trending