आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 11 :चेन्नईच्या सुपरकिंग्जचा मुंबईवर विजय; नृत्याविष्कारातून अायपीएलला सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सिनेअभिनेता हृतिक राेशन, प्रभुदेवासह कलाकारांच्या खास नृत्याविष्कारातून ११ व्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीग (अायपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेला शनिवारी सुरुवात झाली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा उद््घाटनीय साेहळा रंगला. या वेळी माेठ्या संख्येत बीसीसीअायचे मान्यवर उपस्थित हाेते. विद्युत राेषणाईसह फटाक्यांच्या अातषबाजीने यंदाच्या साेहळ्याला रंगत चढली. चाहत्यांनीही या वेळी माेठ्या संख्येत उपस्थित दर्शवली. त्यामुळे हा साेहळा चांगलाच चर्चेत ठरला. या साेहळ्यावर खर्चाला यंदा मंडळाने कात्री लावली. तरीही १८ काेटींच्या खर्चातून एका तासात साेहळ्याला रंगत अाणली गेली. चेन्नईच्या टीने सलामीला यजमान मुंबईला घरच्या मैदानावर १ विकेटने पराभूूत केले. 

 

प्रभुदेवाने वेधले सर्वांचे लक्ष 

‘मुकाबला, मुकाबला’ गाण्यावर सिनेअभिनेता प्रभुदेवाने अापल्या खास शैलीतील केलेल्या नृत्यातून उपस्थिती चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्यासाेबत अनेक चाहत्यांनी ठेेकाही धरला हाेता. त्यानंतर हृतिक राेशननेही अापली कला सादर केली. 

 

केदारचा विजयी चाैकार; चेन्नईचा मुंबईवर राेमहर्षक विजय; ब्राव्हाे ठरला सामनावीर 
ब्राव्हाेच्या (६८) तुफानी फटकेबाजीनंतर केदार जाधवने (२४) मारलेल्या चाैकाराच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने शनिवारी सलामीच्या सामन्यात गत चॅम्पियन मुंबईवर राेमहर्षक विजयाची नाेंद केली. चेन्नईने सलामीला एका गड्याने विजय संपादन केला.  झंझावाती  खेळी करणारा ब्राव्हाे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १६५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपरकिंग्जने ९ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. यासह चेन्नईने स्पर्धेत तुफानी खेळीच्या बळावर विजयाचे खाते उघडले. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक...

बातम्या आणखी आहेत...